आम. जितेंद्र आव्हाड यांच्यासह बशीर मुर्तजा ३ रोजी कुडाळ मध्ये…

राष्ट्रवादी (एसपी) च्या कार्यकर्त्यांसोबत होणार बैठक..

कुडाळ ता.०१-: सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एसपी च्या सर्व आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना कळविण्यात येते की, राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) चे जिल्हा प्रभारी तथा माजी मंत्री आमदार जितेंद्र आव्हाड व पक्ष निरीक्षक बशीर मुर्तजा हे शनिवार दिनांक ३ मे २०२५ रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर कुडाळ येथे येणार आहेत. यावेळी हॉटेल लेमन ग्रास येथे दुपारी २ वाजता सिंधुदुर्ग राष्ट्रवादी काँग्रेसची (शरदचंद्र पवार) जिल्हा कार्यकारिणी व मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी जिल्हा अध्यक्ष अमित सामंत, माजी राज्यमंत्री प्रवीणभाई भोसले, प्रांतीक सदस्य प्रसाद रेगे, व्हिक्टर डान्टस, कोकण विभागीय महिला अध्यक्ष सौ अर्चना घारे परब, जेष्ठ नेते नंदूशेठ घाटे, सुरेशभाई दळवी हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शनिवार दिनांक ३ मे रोजी दुपारी २ वाजता बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा अध्यक्ष अमित सामंत यांनी केले आहे.

You cannot copy content of this page