⚡सावंतवाडी ता.१५-: फिर्यादी रोमिओ फ्रान्सिस गोम्स वय ३४ वर्ष रा. कारिवडे हे दि.१७/०४/२०२१ रोजी आपल्या शेत जमिनीतील नारळ काढणारा शेलेस्तीन गोम्स यांना घेऊन गेलेले होते व ते नारळ पाडून झाल्यानंतर ते गोळा करून ठेवून किराणा सामान खरेदी करण्यासाठी कारिवडे गवळीवाडी येथील किराणा मालाचे दुकानात पायी चालत जात असताना सुमारे ०४:१५ चे मानाने आरोपी शंकर कारीवडेकर यांनी बांबूच्या साह्याने दांड्याने मारहाण सुरुवात केली. त्याचवेळी त्यांचा भाऊ दीपक कारीवडेकर व मुलगा गजानन कारीवडेकर यांनी पण आपल्या हातातील बांबूच्या दांड्याच्या साह्याने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली तसेच तिघांनी शिवीगाळ केली असा आरोप फिर्यादी यांनी केलेला होता. यामध्ये न्यायालयाने साक्षीदारांच्या जबानीतील विसंगती, खोटी फिर्याद, आरोपींनी दोषी सिद्ध करण्यासाठी कोणताही पुरावा सरकारी पक्ष हे सादर करू न शकल्याने आरोपी क्र.१ शंकर गुणाजी कारीवडेकर वय ४३वर्षे आरोपी क्र.२ दिपक गुणाजी कारीवडेकर वय.५३ वर्षे आरोपी क्र.३ गजानन दिपक कारीवडेकर वय २४ वर्षे सर्व राहणार कारीवडे गावठाणवाडी तालुका सावंतवाडी यांची भा.द.वि. कलम ३२४,५०४,५०६,३४ या आरोपातून आज सावंतवाडी येथील मे. न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.आरोपीं तर्फे ॲड. रत्नाकर कृष्णा गवस आणी ॲड.राहुल दत्त्ताराम मडगांवकर यांनी काम पाहीले.
शिवीगाळ मारहाण करून दुखापतीस कारणीभूत ठरलेल्या व जीवे मारण्याची धमकी दिलेल्या आरोपातून आरोपींची निर्दोष मुक्तता…
