डिसेंबर अखेर पर्यंत संबंधितांवर कारवाई न झाल्यास नगरपंचायतच्या दारात करणार आत्मदहन;माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक संदेश निकम यांचा इशारा
*💫वेंगुर्ले दि.२८-:* माजी पालकमंत्री तथा विद्यमान आमदार दिपक केसरकर वेंगुर्ला तालुका दौऱ्यावर असताना वेंगुर्ला नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक संदेश निकम यांनी वेंगुर्ला नगरपालिकेतील विविध विकासकामातील त्रुटींची माहिती देत याबाबत चर्चा केली आहे. वेंगुर्ला नगरपालिकेत भाजपची सत्ता असून करोडो रुपयांचा भ्रष्टाचार केला असून माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक संदेश निकम आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलखोल करत शोधून काढला आहे. ऑक्टोंबर महिन्यात नगरपालिकेत घेण्यात आलेले ऑटोरियम एका भोगस कंपनीला देऊन भ्रष्टाचार करण्यात आला आहे. तसेच वेंगुर्ला नगरपालिकेने हरित पट्टा विकसित करण्यासाठी ठराव मंजूर करून देण्यात आला यासाठी माजी पालकमंत्री केसरकर यांनी ५० लाखाचा निधी देण्यात आला होता. या निधीचा गैरवापर करण्यात आला असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्याचप्रमाणे वेंगुर्ला कंपोस्ट टेपो मध्ये माजी मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या मशीन बसविल्या होत्या त्या गेले दोन वर्ष बंद असून त्यांचा चार्ज अधिकारी नाटेकर यांच्याकडून काढून घेत आपल्या मर्जीतील अधिकारी चौधरी यांच्याकडे तत्कालीन मुख्याधिकारी वैभव साबळे आणि नगराध्यक्ष राजन गिरप यांच्याकडे देऊन लाखो रुपयाचा भ्रष्टाचार केला आहे. या प्रकल्पातून दुर्गंधी येत असून ही बाब नागरिकांसह शिवसेनेच्या शिष्ट मंडळांनी ज्यावेळी आतचे मुख्याधिकारी डॉ अमितकुमार सोंडगे यांच्या निदर्शनास आपण आणून दिल्यानंतर आपण एकदिवसीय उपोषण केले असून, यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी येऊन उपोषण स्थगित करण्याची विनंती केल्यानंतर उपोषण स्थगित केले होते. यावेळी खासदार विनायक राऊत आणि आमदार दिपक केसरकर यांच्या माध्यमातून या कामाची चौकशी करण्याचे आश्वासन दिले होते. यावेळी काल आमदार दिपक केसरकर यांनी स्वतः या निकृष्ट कामांची मुख्याधिकारी डॉ. अमितकुमार सोंडगे यांच्याकडून चौकशी करून घेत याचा अहवाल पाठवला आहे. अशा प्रकारे वेंगुर्ला नगरपालिकेत कधीही न झालेला करोडो रुपयांचा भ्रष्टाचार भाजप नगराध्यक्ष राजन गिरप यांच्या कारकिर्दीत झाला आहे. असा आरोप देखील त्यांनी केला आहे. या प्रकरणी योग्य कारवाई डिसेंबर पर्यंत करून आयुक्ता सारखी कमिटी नेमून चौकशी केली जाईल असे आश्वासन माजी पालकमंत्री तथा आमदार दिपक केसरकर यांनी दिले आहे. या आश्वासनाची पूर्ती न झाल्यास जानेवारी महिन्यात आपण नगरपालिकेच्या दारात आत्मदहनाचा इशारा दिला असल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे. यावेळी चौकशी दरम्याने सर्व प्रशासकीय कर्मचारी तसेच शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, शिष्टमंडळ, नगरसेवक आदी उपस्थित होते.