⚡सावंतवाडी ता.१२-: शहरातील खासकीलवाडा येथील बंद घराचे कुलूप तोडून कपाटातील दहा ग्रॅम वजनाचा सोन्याचा हार लंपास करणाऱ्या चोरट्याचा सावंतवाडी पोलिसांनी अवघ्या दोन दिवसात छडा लावला. सोन्याचा हार चोरी प्रकरणी पोलिसांनी न्हावेली मेस्त्रीवाडी येथील महादेव उर्फ अक्षय सुरेश मेस्त्री (वय २२ ) याला शुक्रवारी रात्र जेरबंद केले. संशयित अक्षय मेस्त्री याने चोरी केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. शनिवारी त्याला सावंतवाडी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
सोन्याचा हार चोरल्याप्रकरणी संशयित युवकाला न्यायालयीन कोठडी…
