कुडाळ : प्रति वर्षाप्रमाणे या वर्षी देखील आडेली आबेडकर नगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती उत्कर्ष कार्यकारिणी मंडळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वतीने साजरा करण्यात येणार आहे.
या निमित्ताने 14 रोजी सकाळी 07.00 वापंचशील ध्वजारोहण सकाळी 08.00 वा. प्रतिमेचे पूजन, सकाळी 9 वा.बुद्ध वंदना, त्रिसरण
सकाळी 10 वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी मुलांचे व मान्यवरांचे विचार, सकाळी 11 वाजता बाईक रॅली, दुपारी 3 वाजता हळदीकुंकू समारंभ, संध्याकाळी 5 वाजता ऐतिहासिक व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या सत्याग्रह या विषयी चित्ररथ रात्रौ 9.30 वा भीम जागर व कथक विशारद नृत्यांगना मृणाल सावंत यांचा नृत्य अविष्कार होणार आहे.
दि. 15 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील भीम गीत या समूह गीत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. किमान या समुहात पाचजण आवश्यक आहे. या स्पर्धेमध्ये ज्या संघांना भाग घ्यायचा आहे. त्यांनी आपली नावे प्रवीण आडेलकर,7263857835 उज्ज्वला आडेलकर 9545383072 यांच्या जवळ देण्यात यावी व स्पर्धेत सहभाग नोंदवावा असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष उदय आडेलकर सांस्कृतिक प्रमुख चंद्रकांत आडेलकर यांनी केले आहे.
आडेली येथे भीमगित समूहागित स्पर्धेचे आयोजन…
