हडी भटवाडी येथे १४ पासून ब्राह्मणदेव जागर उत्सव…

मालवण : (प्रतिनिधी)

हडी भटवाडी येथे श्री ब्राह्मणदेव जागर उत्सव आयोजित करण्यात आला असून यानिमित्त सोमवार दि. १४ ते १६ एप्रिल या कालावधी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे.

सोमवार १४ रोजी रात्री ९ ते १२ वाजेपर्यंत स्थानिक मंडळांची भजने होणार आहेत. मंगळवार, १५ रोजी सायंकाळी ७.३० ते १२ वाजेपर्यंत स्थानिक व बाहेरील मंडळांची भजने, रात्री १२ वाजता आरती, बुधवार, १६ रोजी सायंकाळी ७.३० ते १२ वाजेपर्यंत स्थानिक व बाहेरील मंडळांची भजने, रात्री १२ वाजता आरती. गुरुवार, १७ रोजी दुपारी १२ ते ३ वाजेपर्यंत महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थान विश्वस्त कमिटी, बारापाच मानकरी व श्री ब्राह्मणदेव उत्सव कमिटीने केले आहे.

You cannot copy content of this page