सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील मळगाव इंग्लिश स्कूल मळगाव प्रशालेतील ४ विद्यार्थ्यांना कुडाळ-पिंगुळी येथील ग्लोबल फाउंडेशनकडून ज्ञानज्योत शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली.
ग्रामीण भागातील कार्यस्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रगतीस हातभार लावावा, गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रेरणा मिळावी व आर्थिक मदत व्हावी या उदात हेतूने दरवर्षी पिंगुळी येथील ग्लोबल फाउंडेशनकडून चार विद्यार्थ्यांना ज्ञानज्योत शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते. मळगाव इंग्लिश स्कूल मळगाव प्रशालेतील अपूर्वा शिवराम गोडकर, समीक्षा गोपाळ धारगळकर, शांती शंकर गावडे व मैथिली अनंत गावडे या ४ विद्यार्थ्यांना शिष्यवृतीच्या रुपाने प्रत्येकी ३६०० रूपये त्यांच्या बँक खाती जमा करण्यात आली. यासाठी ग्लोबल फाउंडेशन पिंगुळीचे अध्यक्ष प्रसाद परब यांचे मळगाव इंग्लिश स्कूल मळगावचे मुख्याध्यापक मारुती फाले यांनी ऋण व्यक्त केले. शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचे संस्था पदाधिकारी, मुख्याध्यापक, पालक, ग्रामस्थ यांच्याकडून अभिनंदन करण्यात आले.
मळगाव इंग्लिश स्कूल मळगावच्या विद्यार्थ्यांना ग्लोबल फाउंडेशनची शिष्यवृत्ती प्रदान…
