मळगाव इंग्लिश स्कूल मळगावच्या १९८७-८८ बॅचच्यावतीने शाळेस मदत…

८७०८८ रक्कम शाळेच्या छप्पर दुरुस्तीसाठी माजी विद्यार्थी परिवाराजवळ प्रदान..

⚡सावंतवाडी ता.०८-: मळगाव इंग्लिश स्कूल मळगाव शाळेच्या सन १९८७-८८ च्या इयत्ता १० वी बॅचतर्फे छप्पर दुरूस्तीसाठी आज रोख ८७०८८ रक्कम माजी विद्यार्थी परिवाराकडे प्रदान करण्यात आली. या मदतीद्वारे या बॅचकडून एकप्रकारे शाळेच्या छप्पर दुरुस्तीसाठी मदतीचा हात देण्यात आला.
आपण ज्या शाळेत शिक्षण घेतले, त्या शाळेप्रती आपण काहीतरी देणे लागतो, या एकमेव उद्देशाने शाळेच्या छप्पर दुरुस्तीसाठी माजी विद्यार्थी परिवाराने केलेल्या आवाहनाला साथ देत १९८७-८८ बॅचच्यावतीने शाळेसाठी ही मदत करण्यात आली. या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी जमा केलेली रुपये ८७०८८ रक्कम माजी विद्यार्थी परिवाराकडे सुपूर्द करण्यात आली. यावेळी १९८७-८८ चे विद्यार्थी हरी वारंग, समीर परब, उदय नेमळेकर, शंकर म्हापणकर, सुखदेव राऊळ, रामचंद्र लोके, विजय गावडे,,महेश शिरोडकर, सुनील सोनुर्लेकर, सत्यवान हरमलकर, राघोबा राऊळ, रवी हरमलकर आदी माजी विद्यार्थ्यांसह माजी विद्यार्थी परिवाराचे गुरुनाथ नार्वेकर, हरिश नार्वेकर, महेश गावकर, भाऊ देवळी, प्रभाकर तेली आदी उपस्थित होते. शाळेच्या छप्पर दुरुस्तीसाठी ही मदत केल्याबद्दल माजी विद्यार्थी परिवारातर्फे १९८७-८८ बॅचचे आभार व्यक्त करण्यात आले. बॅचने केलेल्या दातृत्वाचे मळगाव तसेच परिसरातून कौतुक होत आहे.

You cannot copy content of this page