कुडाळ : मुख्यमंत्री यांच्या 100 दिवस कार्यक्रमाअंतर्गत ७ कलमी कार्यक्रमानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी पंचायत समिती कुडाळ तसेच अंतर्गत सर्व कार्यालयांना भेट देऊन पाहणी केली.
सदर कार्यक्रमानुसार सर्व कामकाज दोन दिवसात पूर्ण करून घेण्याच्या सूचना दिल्या. सर्व कार्यालयीन महिलांची एकत्रित सभा घेऊन त्यांना असलेल्या समस्या बाबत विचारपूस केली. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत श्री विशाल तनपुरे, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, तसेच सहाय्यक गटविकास अधिकारी श्याम चव्हाण, गटशिक्षणाधिकारी संदेश किंजवडेकर, उपअभियंता लपा श्री हवालदार, उप अभियंता बांधकाम श्री कुलांगे, तालुका आरोग्य अधिकारी श्रीमती शिरोडकर, बाल विकास प्रकल्प अधिकारी श्रीमती चेदवणकर, तसेच सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
जि प सीईओ रवींद्र खेबुडकर यांची कुडाळ प स ला भेट…
