*💫दोडामार्ग दि.२८-:* दोडामार्ग नगरपंचायतचे मुख्याधिकारी शिराज गायकवाड यांना दिनांक २४ नोव्हेंबर रोजी मनसेचे माजी तालुका प्रमुख पांडुरंग उर्फ अभिजित खांबल यांनी धक्काबुक्की केली होती. याविरोधात मुख्याधिकारी गायकवाड यांनी पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर खांबल यांच्यावर गुन्हा दाखल करून काल रात्री त्यांना पोलिसांनी अटक केली होती. आज खांबल याना सावंतवाडी न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने तीन दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. याकामी वकील स्वप्नील कोरगावकर यांनी काम पाहिले आहे.
दोडामार्ग मुख्याधिकारी धक्काबुक्की प्रकरणी मनसेच्या माजी तालुका प्रमुखास तीन दिवसांची पोलिस कोठडी
