⚡मालवण ता.०४-:
सुवर्ण महोत्सवी मालवण व्यापारी संघाच्या प्रयत्नाने आणि सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाच्च्या माध्यमातून ZapApp सोल्यूशन्स प्रा.लि. या कंपनीने विकसीत केलेल्या ‘येतंव’ या स्थानिक प्रवासी/पर्यटक व ऑटोरिक्षा-वाहन चालक यांच्यात दुवा म्हणून काम करणाऱ्या मोबाईल ऍप चे लोकार्पण मालवणचे पोलीस निरीक्षक प्रविण कोल्हे यांच्या हस्ते रामनवमीच्या दिनी ६ एप्रिल २०२५ रोजी सायं. ४ ते ६.३० या वेळेत मालवण हेरिटेज, संत रविदास नगर, भरड मालवण या ठिकाणी करण्यात येणार आहे.
यावेळी जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रसाद पारकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या लोकार्पण सोहळ्यास उपस्थित रहावे, असे आवाहन मालवण व्यापारी संघांचे अध्यक्ष उमेश नेरुरकर व मालवण तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष प्रमोद ओरसकर यांनी केले आहे.