एनएमएमएस परीक्षेत भंडारी हायस्कूलचे घवघवीत यश…

मालवण दि प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य परिषद पुणे आयोजित राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या मागास घटकांसाठी एन एम एस शिष्यवृत्ती परीक्षेत मालवण येथील भंडारी ए सो हायस्कूल मालवणच्या
विध्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले

या परीक्षेत प्रथमेश प्रमोद चव्हाण याने सर्वसाधारण प्रवर्गात २३ वा क्रमांक पटकाविला तर पायल हरिश्चंद्र पेंडुरकर हिने SC मध्ये ६ वा आणि एकता धर्मानंद तांडेल -SBC मध्ये पहिला क्रमांक पटकाविला या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक श्री हनुमंत तिवले सहाय्यक शिक्षक श्री. रामचंद्र बनसोडे, श्री.संदिप अवसरे श्रीमती अनिता चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले

या यशस्वी विद्यार्थ्यांचे भंडारी एज्यू सोसायटी (मालवण) मुंबईचे अध्यक्ष श्री विजय पाटकर संस्थेचे ऑनररी जनरल सेक्रेटरी साबाजी करलकर
शालेय समितीचे चेअरमन सुधीर हेरेकर मुख्य कार्यकारी अधिकारी वामन खोत मुख्याध्यापक एच बी तिवले लोकल कमिटी चे पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे

You cannot copy content of this page