कुडाळ पोलिसांची कारवाई:१ लाख २१ हजाराचा मुद्देमाल जप्त..
⚡कुडाळ ता.०४-: तालुक्यात पणदूर-मायेकरवाडी येथील शंकर बाळकृष्ण केळुसकर (वय 58 वर्षे) यांच्या राहत्या घराच्या बाजूस असलेल्या शेडमध्ये बेकायदेशीर गोवा बनावटीचा मद्य साठा आढळून आला. याबाबत कुडाळ पोलिसांनी कारवाई केली असून संशयित आरोपी शंकर बाळकृष्ण केळुसकर याला ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकूण दारूच्या बाटल्या आणि जुना वापरातील फ्रिज मिळून एकूण १ लाख २१ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती कुडाळ पोलीस ठाण्यातून देण्यात आली.
याबाबत हकीकत अशी कि संशयित आरोपी शंकर बाळकृष्ण केळुसकर यांच्या राहत्या घराच्या बाजूच्या शेड मध्ये National Royal brand असे लेबल असलेल्या 180 मिलिमापाच्या 480 बाटल्या प्रत्येकी किंमत 120 प्रमाणे एकूण किंमत 57,600/- 2) McDonald’s number 1whisky असे लेबल असलेल्या एकूण 96 बाटल्या प्रत्येकी किंमत 200/- रुपये प्रमाणे एकूण किंमत 19200/- 3) DSP black Deluxe whisky असे लेबल असलेल्या 180 ml मापाच्या 48 बाटल्या प्रत्येकी किंमत एकूण किंमत 200/- रुपये प्रमाणे. एकूण किंमत 9600/- 4) Royal choice coconut feny असे लेबल असलेल्या 375 मध्ये मापाच्या 96 बाटल्या प्रत्येकी किंमत 200/व रुपये प्रमाणे. एकूण किंमत 19200/- 5,) Tuborg strong असे लिहिलेले अश्विनी मापाची 20 टीन प्रत्येकी किंमत 150 रुपये प्रमाणे. एकूण किंमत 3000/- 6 ) Kingfisher strong असे लिहिलेले 500 मिली मापाचे 20 टिन प्रत्येकी किंमत 150 रुपये प्रमाणे. एकूण किंमत 3000/- 7) एक हायर कंपनीचा गुलाबी रंगाचा फ्रिज जुना वापरता किंमत रुपये 10,000/- असा एकूण मिळून १ लाख २१ हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल आढळून आला. या प्रकरणी पोलीस शिपाई शांताराम चंद्रकांत वराडकर यांनी कुडाळ पोलीसात फिर्याद दिली असून यांनी संशयित आरोपी शंकर बाळकृष्ण केळुसकर आणि मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. त्याला अटक करण्यात आली आहे.
संशयित आरोपीवर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 65 (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोऊनि श्री वाघाटे अधिक तपास करीत आहेत. त्यांच्या सोबत हवालदार कृष्णा केसरकर, हरेश पाटील, महेश जळवी, एएसआय देवानंद माने यांनी काम पाहिले.