शिरवल रतांबेवाडी येथे मंगळवारी २ एप्रिल रोजी हरिनाम सप्ताह…

कणकवली – तालुक्यातील शिरवल रतांबेवाडी येथे एकदिवसीय सात प्रहराचा अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन मंगळवारी २ एप्रिल रोजी करण्यात आले आहे.यानिमित्त सकाळी १० वाजता घटस्थापना, आरती, तिर्थप्रसाद, रात्री ८ ते ९ वा.पर्यंत हरीपाठ, त्यानंतर रात्री ९ वा.पासून स्थानिकांची आणि कणकवली तालुक्यातील भजन मंडळाची सुस्वर भजने,दींडी ,काकड आरती आदी कार्यक्रम होणार आहेत . बुधवारी २ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता घटविसर्जन आणि दुपारी महाप्रसादाने हरीनाम सप्ताह कार्यक्रमांची सांगता होणार आहे.तरी सर्व भाविक भक्तांनी कार्यक्रमांना उपस्थित राहुन कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. असे आवाहन श्री.महापुरुष मित्र मंडळ शिरवल रतांबेवाडी यांनी केले आहे.

You cannot copy content of this page