असंख्य कार्यकर्त्यांनी केला भाजपमध्ये प्रवेश: पालकमंत्री नितेश राणेंकडून स्वागत..
⚡सावंतवाडी ता.०८-: मळगाव येथील राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आज पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.त्यांच्या या प्रवेशामुळे राष्ट्रवादीच्या अर्चना घारेंना हा मोठा धक्का मानला जात आहे. ओरोस येथील भाजप कार्यालयात त्यांचा हा पक्षप्रवेश संपन्न झाला.
