कोलगाव साईनगर येथील रस्त्याबाबत वेधले लक्ष: तर लवकरच आम. दीपक केसरकर,व आम. निलेश राणे यांच्या माध्यमातून रस्ता खुला करून देणार; संजू परबांचे आश्वासन..
⚡सावंतवाडी ता.०८-: कोलगाव साईनगर येथील गेले अनेक वर्ष रस्ता खुला करण्याबाबत ग्रामस्थांकडून होत असलेल्या मागणीबाबत वारंवार लक्ष वेधून देखील ग्रामपंचायत रस्ता खुला करण्यास तयार नसल्याने आज कोलगाव ग्रामस्थांनी शिवसेना जिल्हा संघटक संजू परब यांच्याकडे धाव घेत कैफियत मांडली.
जवळपास ४२ कुटुंबाचा हा विषय आहे. दरम्यान, हा रस्ता खुला करण्याबाबत तात्कालीन तहसीलदार म्हात्रे यांनी 2020 मध्ये ग्रामपंचायतला पत्र दिले होते. तरी देखील ग्रामपंचायत कोणतेही दखल घेत नसल्याने आज ग्रामस्थांनी संजू परब यांच्याकडे याबाबत लक्ष वेधले. यावेळी आमदार दीपक केसरकर व आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून हा रस्ता येत्या मे महिन्यापर्यंत आपण खुला करून देऊ असे आश्वासन उपस्थित ग्रामस्थांना श्री. परब यांनी दिले. हा रस्ता एका विशिष्ट समाजातील व्यक्तीकडून हा रस्ता बंद करण्यात आल्याच आरोप यावेळी ग्रामस्थांनी केला.
यावेळी राजेश गोंदावळे,करजाना सय्यद,नितीन उरणकर, अरविंद मेस्त्री, महादेव साळवी, रामचंद्र वाडकर, दत्ताराम स्वार,धोंडू इन्सुलकर, ओंकार माने, संतोष केळुलकर, उमेश प्रभू, कृष्णा तेंडुलकर, अरविंद मुंनकर, सुभाष सावंत, शरद जाधव, वसंत जाधव, भास्कर मेस्त्री, एस एस मोरे, आर. ए.स गवणकर आदी उपस्थित होते.
