⚡मालवण ता.०५-: थोर नाटककार के राम ग गडकरी स्मृतिप्रित्यर्थ मालवण येथील अष्टपैलू कलानिकेतन संस्थेमार्फत जिल्हास्तरीय सवेश साभिनय नाट्यगीत गायन स्पर्धेत बालगटात गौरी राजन वस्त, कुमार गटात तनुश्री निलेश मराठे, आणि खुल्या गटात कौस्तुभ धुरी यांनी प्रथम क्रमांक पटकाविला
मालवण येथील अष्टपैलू कलानिकेतन संस्थेमार्फत
सलग १४ व्या वर्षी भरड येथील श्री दत्त मंदिराच्या प्रांगणात जिल्हास्तरीय सवेश साभिनय नाट्यगीत गायन स्पर्धा घेण्यात आली
या स्पर्धेत बाल गटात २०, कुमार गटात ८ व खुल्या गटातील १० स्पर्थकांनी सहभाग दर्शविला या स्पर्धेचे पारितोषिक वितरण स्पर्धेच्या पारितोषिकाचे प्रायोजक संजय गावडे व संस्थेच्या पदाधिकारी यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी सगीत साथ भालचंद्र केळुसकर, पंकज पाटील, सुधीर गोसावी व विशाल केळुसकर यांनी केली परीक्षक संजय धुपकर, शेखर पणशीकर यांच्यासोबत भाई शेवडे यानी स्पर्धकांना मार्गदर्शन केले.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे
बालगट : प्रथम – गौरी राजन वस्त, द्वितीय – श्लोक निलेश सावंत, तृतीय – मैत्री दयानंद मालवणकर, उत्तेजनार्थ प्रथम – कृपा केदार साळगावकर,उत्तेजनार्थ द्वितीय – उन्नती गणेश गोडे,उत्तेजनार्थ तृतीय – मनवा विशाल केळूसकर
कुमारगट : प्रथम – तनुश्री निलेश मराठे, द्वितीय – हर्षदा बाळकृष्ण होडावेडकर, तृतीय- प्रांजली महेश कनेटकर उत्तेजनार्थ प्रथम – ईशा अनिल धुरी उत्तेजनार्थ द्वितीय – सुशील दत्तात्रय प्रभूकेळुसकर उत्तेजनार्थ तृतीय – कनक दीनानाथ काळोजी
खुलागट : प्रथम – कौस्तुभ धुरी, द्वितीय – वैभवी देविदास वेरलकर , तृतीय – पुनम रामचंद्र घाडी, उत्तेजनार्थ प्रथम – चैताली राजेंद्र मेस्त्री, उत्तेजनार्थ द्वितीय – तेजल विश्राम परब, उत्तेजनार्थ तृतीय – सौ श्वेता विजय यादव
