शिरोडा केरवाडा येथे चोरट्यांनी तीन घरे फोडली…

वेंगुर्ला प्रतिनिधी
शिरोडा केरवाडा येथील विद्या दिनेश सावंत यांच्या घरात अज्ञात चोरट्यांनी घुसून कपाटातील दहा हजार रुपये रोख रक्कम व सोन्याची अंगठी चोरून नेली आहे. तसेच शेजारील दोन बंद घरे फोडून चोरीचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्या हाती काही लागले नाही. याबाबत अज्ञात चोरट्या विरोधात वेंगुर्ले पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
शिरोडा केरवाडा येथे १२ फेब्रुवारी रोजी दुपारी ३.३० ते १५ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने हा चोरीचा प्रयत्न केला आहे. विद्या सावंत या आपले राहते घर बंद करून मुंबई येथे गेल्या होत्या. घरात कोणी नसल्याची संधी साधून घर अज्ञात चोरट्याने फोडून घरात प्रवेश केला. आणि घरातील सावंत यांच्या कपाटातील रोख रक्कम दहा हजार व सोन्याची अंगठी चोरून नेली. ही चोरी करून जाताना त्या चोरट्यांनी बाजूच्या दोन बंद घरांकडेही आपला मोर्चा वळवला. त्या घराची कुलुपे तोडून चोरीच्या उद्देशाने त्या घरात ही प्रवेश केला मात्र त्या चोरट्यांच्या या दोन्ही घरात किरकोळ वस्तू सोडले तर काही हाती लागली नाही.
याप्रकरणी सावंत यांनी शिरोडा पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार १९ फेब्रुवारी रोजी पोलिसांनी वेंगुर्ले पोलीस ठाण्यात सायंकाळी कलम ३०५, ३३१ (३) ३३१(४), ६२ अन्वये अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली
पो.हे.कॉ. हडकर करीत आहेत.

You cannot copy content of this page