क्षयरोग दुरीकरण अंतर्गत विविध राज्यस्तरीय स्पर्धांचे आयोजन…

जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा:जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सई धुरी यांचे आवाहन..

ओरोस ता २०
राष्ट्रीय क्षयरोग दूरिकरण कार्यक्रमातंर्गत “निक्षय आठवडा” 17 फेब्रवारी ते 23 फेब्रुवारी 2025 या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त राज्यस्तरीय क्षयरोग विषयक विविध जनजागृती स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी यात मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सई धुरी यांनी केले आहे.
सार्वजनिक आरोग्य विभाग आणि वैदयकिय महाविदयालयातील अधिकारी व कर्मचारी, इतर सर्व शासकिय विभागातील अधिाकरी व कर्मचारी, सर्वसामान्य नागरीक अशा तीन गटांत ही स्पर्धा होणार आहे. क्षयरोग विषय जनजागृती ही यातील एक स्पर्धा आहे. ही स्पर्धा एकूण सहा श्रेणीमध्ये विभागण्यात आलेली आहे. यात क्षयरोग विषयक जनजागृती स्पर्धा, क्षयरोग विषयक ओपन माईक स्पर्धा, क्षयरोग विषयक नाटक स्पर्धा, क्षयरोग विषयक कलाप्रदर्शन स्पर्धा, क्षयरोग विषयक रांगोळी स्पर्धा, क्षयरोग विषयक चित्रकला स्पर्धा, क्षयरोग विषयक प्रश्नमंजुषा स्पर्धा, असे विषय ठेवण्यात आले आहेत. या अंतर्गत राष्ट्रिय क्षयरोग दूरिकरण कार्यक्रमात योगदान देणा-या व्यक्तींचा सत्कार करण्यात येणार आहे.
कविता लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली असून यासाठी क्षयरोग मुक्त जग ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. यासाठी मराठी, इंग्रजी, हिंदी भाषा निवडण्याची सवलत आहे. एका कवितेसाठी जास्तीत जास्त दोन जण सहभाग घेवू शकतात. यासाठी फक्त 500 शब्दमर्यादा ठेवण्यात आली आहे. यासाठी सुसंगत विषय प्रभाव व मौलिकता याला प्राधान्य राहणार आहे. तसेच लघुकथा लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. क्षयरोग दूरिकरणासाठीचे संघटीत प्रयत्न हा विषय या स्पर्धेसाठी असून मराठी, इंग्रजी, हिंदी यातील कोणतीही भाषा निवडता येवू शकते. एका लघु कथेसाठी जास्तीत जास्त दोन स्पर्धक सहभागी होवू शकतात. यासाठी एक हजार एवढी शब्द मर्यादा आहे. व्हिीडीओ रील निर्मिती स्पर्धा सुध्दा आयोजित करण्यात आली आहे. यासाठी क्षयरोगविरोधी औषधांना दाद न देणारा क्षयरोग, खोकल्याचा शिष्टाचार, क्षयरोग प्रतिबंधक उपचार, पोषण आणि क्षयरोग प्रतिबंधक उपचार, पोषण आणि क्षयरोग, क्षयरोग कलंक दूर करणे व हवेव्दारे जंतुसंसर्ग नियंत्रण आदी विषय देण्यात आले आहेत. यासाठीही भाषा मराठी, इंग्रजी, हिंदी यातील कोणतीही निवडता येणार आहे. एका रीलसाठी फक्त सहा जण सहभागी होवू शकतात. यासाठी ९० सेकंद एवढा वेळ आहे. सुसंगत विषय प्रभाव व सर्जनशिलता याला प्राधान्य दिले जाणार आहे.
मीम बनविण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली असून यासाठी क्षयरोगाचे लवकर निदान आणि त्वरीत उपचार हा विषय देण्यात आला आहे. यासाठी प्रवेश प्रती सहभागी विभाग जास्तीत जास्त तीन ठेवण्यात आला आहे. यासाठी आकार इंस्टाग्राम पोस्ट करण्यायोग्य चौरस किंवा आयताकृती आवश्यक आहे. याचे मुल्यांकन निकष सुसंगत विषय मौलिक व विनोदस्तर यावर राहणार आहे. तसेच लघुपट व्हिडिओ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यासाठी क्षयरोग कलंक दूर करणे किंवा क्षयरोग मुक्त जग हा विषय ठेवण्यात आला आहे. मराठी, हिंदी आणि इंग्रजी यातील कोणत्याही भाषेतून लघु चित्रपट सादर करता येवू शकतो. प्रति सहभागी विभाग फक्त एक आणि प्रति संघ जास्तीत जास्त 15 सदस्य असा प्रवेश ठेवण्यात आला आहे. 1 हजार एवढी शब्द मर्यादा आहे. वेळ मर्यादा फक्त 10 मिनीट आहे. यासाठी मुल्यांकन निकष सुसंगत विषय, प्रभाव, सर्जनशीलता, छायाचित्रण आणि व्हिडिओ संपादन असे ठेवण्यात आले आहेत.

चौकट
या सर्व स्पर्धांच्या प्रवेशिका पाठविण्याची अंतिम तारीख 24 फेब्रुवारी 2025 आहे. ntep.acsm.mh@gmail.com या ईमेल वर अथवा नोंदणी व प्रवेशिकेसाठी गुगल फॉर्म लिंक
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfWa6ZgLONrIJcQ 5FEIjhqIe आणि X9Jia8TiD4100FMZkTaTOqw/viewform?ups=header येथे उपलब्ध करून देण्यात आला आहे. प्रवेशिकेसोबत सर्व सहभागीदारांची नावे, प्रमुख सहभागीदाराचे नांव, पदनाम, संपर्क भ्रमणध्वनी क्रमांक अशी माहिती भरावी, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी यांनी केले आहे.

You cannot copy content of this page