त्या आरोपीस स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या सिंधुदुर्ग पथकाने घेतले ताब्यात…

⚡देवगड ता.२१-: कामावरून घरी परत जाणाऱ्या पादचारी तरूणीची पिशवी हिसकावून मोबाईल व रोकड लंपास करून आपल्या ताब्यातील मोटरसायकल तेथेच टाकून पळ काढणाऱ्या चोरट्याला स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने सापळा रचून ओरोस खर्येवाडी येथील बसस्टॉपजवळ २१ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजता शिताफीने ताब्यात घेतले.

सुर्यकांत अनंत चव्हाण(३९) रा.ओरोस खर्येवाडी असे संशयिताचे नाव असून चोरलेला मोबाईल व रोख रक्कम पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.चोरीची घटना ९ जानेवारी रोजी सायंकाळी ५.४५ वा.सुमारास आचरा मुणगे घाटीरस्त्यावर घडली होती.

You cannot copy content of this page