⚡वेंगुर्ले ता.२१-:
हिंदू ह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची 99 व्या जयंती निमित्त वेंगुर्ले तालुका शिवसेना उ. बा. ठाकरे पक्षाचा वतीने विविध सामाजिक उपक्रमाचे नियोजन करण्यात आले. सदर दिवशी सकाळी 11 वाजता श्री शिवाजी हायस्कुल मधील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांसाठी पुस्तक वाटप कार्यक्रम व दुपारी 3 वाजता शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात महिलांसाठी हळदीकुंकु कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आलेले आहे.
सदर कार्यक्रमासाठी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख बाबुराव धुरी, सावंतवाडी विधानसभा मतदार संघ प्रमुख रूपेश राऊळ, माजी आमदार राजन तेली, शिवसेनेच्या उपनेत्या जानवी सावंत, महिला जिल्हा संघटक श्रेयाताई परब, सावंतवाडी विधानसभा मतदार संघ महिला संघटक सुकन्या नरसुले आदी प्रमुख पदाधिकाऱी सदर कार्यक्रमास उपस्थित राहाणार आहेत.
या कार्यक्रमास शिवसेना (उबाठा ठाकरे शिवसेना पक्षाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन ठाकरे शिवसेनेचे वेंगुर्ले तालुका प्रमुख यशवंत उर्फ बाळू परब यांनी केले आहे.
वेंगुर्लेत उबाठा शिवसेनेतर्फे बाळासाहेबांच्या जयंती निमित्त दिनांक 23 रोजी समाजपयोगी कार्यक्रम…
