⚡मालवण ता.२१-:
रोटरी क्लब मालवण तर्फे २०२४- २५ या शैक्षणिक वर्षातील इयत्ता पाचवी व इयत्ता आठवी ची स्कॉलरशिप सराव परीक्षा शनिवार दि. १ फेब्रुवारी रोजी भंडारी हायस्कूल, मालवण येथे घेण्यात येणार आहे. ही परीक्षा मराठी व इंग्रजी या दोन्ही माध्यमातून घेतली जाणार आहे. दुपारी २ ते ३. ३० यावेळेत पहिला पेपर तर सायंकाळी ४ ते ५. ३० पर्यंत दुसरा पेपर होणार आहे. तरी शाळांनी परीक्षेस बसू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची नावे प्रवेश शुल्कासह दि. २८ जानेवारी पर्यंत लिमये हॉस्पिटल मालवण येथे नोंदवावीत. नाव नोंदणीचे पत्र देताना परीक्षार्थीचे नाव, शाळेचे नाव, इयत्ता, माध्यम नोंद करावी, असे आवाहन रोटरी क्लबतर्फे करण्यात आले आहे.
रोटरी क्लब मालवणतर्फे १ फेब्रुवारीला शिष्यवृत्ती सराव परीक्षा…
