⚡वेंगुर्ला ता.२१-: वेंगुर्ला नगरवाचनालयातर्फे घेण्यात आलेल्या मनोहर भांडारकर वक्तृत्व स्पर्धेत दिक्षा मराळ तर आरोसकर वक्तृत्व स्पर्धेत दिक्षिता मातोंडकर यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.
येथील नगर वाचनालयातर्फे १९ जानेवारी रोजी जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले होते. ‘अभिजात मराठी‘ यावर मनोहर शां.भांडारकर वक्तृत्व स्पर्धेत प्रथम-दिक्षा मराळ (एस.आर.पाटील महाविद्यालय, पाट), द्वितीय-दिक्षिता मातोंडकर (मातोंड न्यू इं. स्कूल), तृतीय-श्रावणी आरावंदेकर (कुडाळ हायस्कूल) तर ‘ई वाहने‘ यावर ज.बा.आरोसकर वक्तृत्व स्पर्धेत प्रथम-दिक्षिता मातोंडकर (मातोंड न्यू इं. स्कूल), द्वितीय-भक्त नाईक (सरस्वती विद्या.आरवली), तृतीय-प्रज्ञा आरावंदेकर (न्यू इं.स्कूल उभादांडा) यांनी क्रमांक पटकाविले. मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना रोख पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. परिक्षण कैवल्य पवार, भाऊ करंगुटकर, माया परब, दिपराज बिजितकर यांनी केले.
