आस्था ग्रुपतर्फे मालवण तालुकास्तरीय शालेय मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन…!

⚡मालवण ता.१४-: आस्था ग्रुप मालवणच्या वतीने दि. २५ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजता मालवण तालुकास्तरीय शालेय मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. हि स्पर्धा पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावी अशा दोन गटात होणार आहे.

या स्पर्धेची सुरुवात मालवण कोळंब सागरी महामार्ग येथून होणार आहे. यामध्ये लहान गट- मुलगे आणि मुली- पाचवी ते सातवी – प्रथम क्रमांक- रुपये १००० .व चषक, द्वितीय क्रमांक रुपये ७०० व चषक
तृतीय क्रमांक रुपये ५०० व चषक, मोठा गट -मुलगे आणि मुली- आठवी ते दहावी -प्रथम क्रमांक रुपये १५०० व चषक, द्वितीय क्रमांक रुपये १००० व चषक, तृतीय क्रमांक रुपये ७०० व चषक अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. इच्छुक स्पर्धकांनी दि. २३ जानेवारी पर्यंत नावनोंदणी करावी, माहितीसाठी सचिव मनोज चव्हाण (9422373356) व स्पर्धा प्रमुख बंटी केनवडेकर (9422596682) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page