आम. निलेश राणे यांचा दृढविश्वास:डिटेल इंजिनियरिंग ऑफिसचे थाटात उदघाटन..
⚡मालवण ता.१३-: एकवीसाव्या शतकात वाटचाल करत असताना इथल्या तरुण तरुणीच्या हातांना काम मिळावे म्हणून व्यवसायासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आवश्यक असणारी ट्रेनिंग सेंटरची वानवा मेस्त्री कुटुंबियांच्या एक्सेन्ट टेक्नो सोल्युशनच्या मालवण शाखेने भरून काढली असून मेस्त्री कुटुंबियांनी सुरु केलेले हे ट्रेनिंग सेंटरकडे व्यवसाय म्हणून न बघता ती समाजसेवा म्हणून त्याकडे पाहिले पाहिजे. याच ट्रेनिंग सेंटरमुळे इथल्या तरुणांच्या हातांना काम मिळण्यास मदत मिळेल असे प्रतिपादन मालवण कुडाळचे आमदार निलेश राणे यांनी येथे बोलताना केले.
मालवण कुंभारमाठ येथील शासकीय तंत्रनिकेतनच्या नजीक असणाऱ्या वर्षाऋतू रेसिडन्सी मध्ये एक्सेन्ट टेक्नो सोल्युशन यां मालवण मधील पहिल्या डिटेल इंजिनियरिंग ऑफिसचे उदघाटन आमदार निलेश राणे यांच्या हस्ते झाले. यावेळी व्यासपीठावर शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, संतोष मेस्त्री, आनंद मेस्त्री, प्रकाश मेस्त्री, सौ. वर्षा मेस्त्री, सिद्धेश मेस्त्री आदी व इतर मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी आनंद मेस्त्री व प्रकाश मेस्त्री यांनी उपस्थितांचे स्वागत केले. तर संतोष मेस्त्री यांनी प्रास्ताविक केले. यावेळी बोलताना आमदार निलेश राणे म्हणाले, टेक्निकल विषय शिकविणे हा अवघड आणि किचकट विषय आहे. अशावेळी मेस्त्री कुटुंबियांनी एक्सेन्ट टेक्नो सोल्युशन आणि सुविधा इन्स्टिट्युटच्या माध्यमातून तांत्रिक शिक्षण देऊन हजारो हातांना काम दिले आहे. आता एक्सेन्ट टेक्नो सोल्यूशनची मालवणात शाखा निर्माण होत आहे. या प्रशिक्षण केंद्रातून इथल्या बेरोजगारांना काम देण्याचे कार्य केले जाईल आणि यां भागात आर्थिक सुबत्ता येईल. म्हणूनच मेस्त्री कुटुंबियांनी सुरु केलेल्या एक्सेन्ट टेक्नो सोल्यूशन ट्रेनिंग सेंटरचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. यासाठी आवश्यक असणारी सर्वतोपरी मदत केली जाईल, अशी ग्वाही आम. राणे यांनी दिली. यावेळी दत्ता सामंत यांनी मेस्त्री यांच्या एक्सेन्ट टेक्नो सोल्युशन सेंटरचे कौतुक केले. सूत्रसंचालन अक्षय सातार्डेकर यांनी केले. आभार प्रकाश मेस्त्री यांनी केले.
