⚡मालवण ता.०६-:
कराटे या क्रीडा प्रकाराचा राज्यभर प्रचार व प्रसार करण्यासाठी युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय भारत सरकारशी संलग्न असणाऱ्या स्टेअर्स फाउंडेशन च्या सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख पदी कराटे प्रशिक्षक विजय रघुनाथ केळुसकर यांची निवड करण्यात आली आहे.
विजय केळूसकर यांची ही निवड मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे टूर्नामेंट टेक्निकल डायरेक्टर गणेश मंगल गिरी तसेच कराटे प्रमुख विशाल जाधव, महाराष्ट्र राज्याचे स्पर्धा समिती चेअरमन राजकपूर बागडी यांच्याद्वारे करण्यात आली. विजय केळुसकर यांच्या स्टेअर्स च्या सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख पदी झालेल्या निवडीमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कराटे खेळाडूंना स्टेअर्स फाउंडेशनच्या माध्यमातून जिल्हा, राज्य, राष्ट्रीय कराटे स्पर्धा खेळण्याची संधी मिळणार आहे, तसेच मुलींना व महिलांना स्वतःचे स्वरक्षण करता यावे, यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात कराटे प्रशिक्षण शिबिर देखील घेतली जाणार आहेत.