बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूल, कुडाळचे उद्या (७) स्नेहसंमेलन…

⚡कुडाळ ता.०६-: बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूल, कुडाळच स्नेहसंमेलन मंगळवार दिनांक ७ जानेवारी २०२५ रोजी आयोजित करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे.
विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने दरवर्षी कुडाळ येथील बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेच्या विविध विभागांचे स्नेहसंमेलन आयोजित केले जाते. मंगळवार दिनांक ७ जानेवारी २०२५ रोजी बॅरिस्टर नाथ पै सेंट्रल स्कूलच्या स्नेहसंमेलनाचे सायंकाळी साडेसहा वाजता सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सन्माननीय अनिल पाटील यांच्या हस्ते व संस्था चेअरमन उमेश गाळवणकर, सेंट्रल स्कूलच्या प्राचार्य चैताली बांदेकर, संस्था सीईओ अमृता गाळवणकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बॅ.नाथ पै शिक्षण संस्थेच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेले आहे. तरी या सेंट्रल स्कूल मध्ये शिकणाऱ्या पालकांनी आपल्या पाल्यासह यामध्ये सहभागी होऊन या स्नेहसंमेलनाचा आनंद घ्यावा .असे आवाहन सेंट्रल स्कूलच्या प्राचार्य चैताली बांदेकर यांनी केले आहे.

You cannot copy content of this page