गोगटे- वाळके काॅलेजमध्ये नेट– सेट परीक्षेसंदर्भात दोन दिवसीय कार्यशाळा…!

⚡बांदा ता.०४-: येथील गोगटे –वाळके महाविद्यालयातील पाडगावकर रिसर्च सेंटरच्या वतीने नेट – सेट परीक्षेच्या संदर्भात सविस्तर मार्गदर्शन करण्यासाठी दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन शनिवार दिनांक ११ जानेवारी ते रविवार दिनांक १२ जानेवारी २०२५ रोजी करण्यात आले आहे. सदर कार्यशाळा शनिवार दि. ११ जानेवारी रोजी सकाळी ९ ते ५ रविवार दि.१२ जानेवारी रोजी सकाळी ९ ते२ या वेळेत काॅलेजमध्ये आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेत नेट -सेट परीक्षेच्या पहिल्या पेपरच्या अनुषंगाने सविस्तर मार्गदर्शन करून प्रात्यक्षिकासह विषयतज्ज्ञ मांडणी करणार आहेत .या दोन दिवशीय कार्यशाळेत विषय तज्ञांच्या माध्यमातून पहिल्या पेपरच्या अनुषंगाने विविध शंकांचे निरसन यावेळी करण्यात येणार आहे. हा पहिला पेपर कसा सोडवावा , उत्तरांची तांत्रिक बाजू कशी असते , येणारे संभाव्य प्रश्न कशा स्वरूपाचे असतात,प्रश्नपत्रिकेचे स्वरूप, अभ्यासक्रमाचे स्वरूप व वापरात येणारी अभ्यासतंत्रे यासंदर्भात सविस्तर असे मार्गदर्शन यावेळी तज्ज्ञांच्या मार्फत करण्यात येणार आहे .ही दोन दिवसीय कार्यशाळा नेट – सेट परीक्षेला सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खुली आहे. या कार्यशाळेत अभ्यासपूरक असे साहित्य देण्यात येणार आहे .तरी ज्या विद्यार्थ्यांना या कार्यशाळेत सहभागी व्हायचे असेल त्यांनी कार्यशाळा समन्वयक प्रा. डॉ. एन .डी .कार्वेकर ( 9423304414 ) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोविंद काजरेकर यांनी केले आहे.

You cannot copy content of this page