उद्योजक शैलेश लाड यांचा शैक्षणिक उठाव अंतर्गत उपक्रम..
बांदा/प्रतिनिधी
युवा उद्योजक शैलेश लाड यांनी शैक्षणिक उठावाअंतर्गत बांदा शहरातील निमजगा अंगणवाडीला स्टॅन्ड फॅन व नेत्यांचे फोटो भेट दिलेत.
यावेळी अंगणवाडी सेविका सौ. वर्षा आगलावे, अंगणवाडी मदतनीस सौ. गीतांजली सावंत यांच्यासह पालक उपस्थित होते. अंगणवाडीत मुलांना उन्हाळ्यात फॅनची सोय नसल्याने गैरसोय होत होती. तसेच अंगणवाडीत थोर नेत्यांच्या प्रतिमा नसल्याने दिन साजरे करताना अडचणी येत होत्या. हि गरज लक्षात घेऊन श्री लाड यांनी अंगणवाडीसाठी फॅन व प्रतिमांची सुविधा उपलब्ध करून दिली.
अंगणवाडीच्या वतीने वर्षा आगलावे यांनी श्री लाड यांचे आभार व्यक्त केलेत.
