⚡वेंगुर्ला ता.११-: सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्या आदेशान्वये व वेंगुर्ला पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली वेंगुर्ला पोलीस व न्यू इंग्लिश स्कुल मातोंडच्या शालेय विद्यार्थी यांच्या संयुक्त विद्यमानाने वेंगुर्ला एसटी स्टँड समोरील पटांगणावर १० डिसेंबर रोजी ‘डायल ११२‘ बाबत पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले.
या पथनाट्याद्वारे जनमाणसात ११२बाबत माहिती देऊन त्याचा उद्देश काय आहे हे दाखविण्यात आले. महिला पोलीस हवालदार रंजीता चौहान व महिला पोलीस नाईक सावी पाटील यांच्या संकल्पनेतून तसेच न्यू इंग्लिश स्कूल शाळेतील सर्व शिक्षक यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम पार पडला.
महिला पोलीस हवालदार रंजिता चौहान व महिला पोलीस नाईक सावी पाटील यांनी वरिष्ठांच्या आदेशापमाणे प्रत्येक शाळा, कॉलेज या ठिकाणी जाऊन विद्यार्थ्यांना नशा मुक्ती, सायबर फ्रॉड व डायल ११२ बाबत जनजागृतीपर कार्यक्रम घेतलेले होते. या अभियानाचा मुख्य उद्देश लोकांमध्ये तसेच महिला व मुलींमध्ये ‘डायल ११२‘ बाबत जनजागृती होऊन एखाद्या अडचणीच्या वेळी किवा संकटाच्यावेळी आपल्याला पोलीस मदत तात्काळ मिळते हा आहे.
‘डायल ११२‘ या कार्यप्रणालीचा संकटकाळी वापर करून पोलीस मदत मागून घ्या जेणेकरून पुढे होणारा अन्याय किवा अत्याचार थांबू शकतो असे आवाहन पोलिस निरिक्षक संदिप भोसले यांनी केले. यावेळी वेंगुर्ला एसटी डेपो मॅनेजर राहुल कुंभार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रमेश तावडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल भगवान चव्हाण, महिला पोलीस हवालदार रंजिता चौहान, अनुराधा देसाई, पोलीस नाईक सावी पाटील, वाहतूक पोलीस मनोज परूळेकर, पोलीस कॉन्स्टेबल प्रथमेश पालकर, महिला कॉन्स्टेबल तुळशी मांजरेकर, पोलिस हवालदार सखाराम परब, न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक संजय तुळसकर यांच्यासह तालुक्यातील पोलीस पाटील उपस्थित होते.
या पथनाट्यात मातोंड हायस्कुलच्या शिक्षक अर्चना पाटील, प्रतीक्षा परब, संजीवनी तुळसकर, विद्यार्थी दिक्षिता मातोंडकर, काजल परब, कोमल मेस्त्री, वैदिक मोहिते, पार्थ नासरे, रोहित नर्से, मंथन परब, कृष्णा महितो, वेदांत राऊळ यांनी सहभाग घेतला. सूत्रसंचालन प्रा.सचिन परूळकर यांनी केले.
