हडी केंद्रस्तरीय बाल कला, क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सव उत्साहात संपन्न…!

⚡मालवण ता.१०-:
मालवण तालुक्यातील हडी केंद्र स्तरीय बाल कला क्रीडा महोत्सवांतर्गत मैदानी स्पर्धा,ज्ञानी मी होणार, समुहगीत व समुहनृत्य स्पर्धा कै. के. जी. मांजरेकर हडी नं १ येथे केंद्रप्रमुख श्री. प्रसाद चिंदरकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाल्या. या स्पर्धांमध्ये हडी केंद्रातील विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत आपले नैपुण्य दाखवले.

या स्पर्धेच्या प्रारंभी तोंडवळी गावचे उपसरपंच हर्षद पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती प्रतिमा पूजन करण्यात आले. तसेच हडी गावचे सरपंच प्रकाश तोंडवळकर यांच्या हस्ते क्रीडाज्योत प्रज्वलीत करून स्पर्धेचे उद्घाटन झाले. केंद्रप्रमुख प्रसाद चिंदरकर यांनी प्रस्ताविक केले. यावेळी गटशिक्षणाधिकारी संजय माने यांनी सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळीशाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा दीक्षा गावकर, उपाध्यक्षा साक्षी कदम, युविका भिसळे, भक्ती हडकर, तैसीन शेख, अफझल शेख आदी मान्यवर उपस्थित होते.

या स्पर्धेसाठी गटशिक्षणाधिकारी संजय माने, हडी नं १ चे मुख्याध्यापक मंगेश कांबळी,उच्च श्रेणी मुख्याध्यापिका शीतल माडये, पदवीधर शिक्षक पांडुरंग कोचरेकर , ज्येष्ठ शिक्षिका सोनाली कदम, अमोल महाजन, कैयुम मोमीन, साक्षी कुबल, विभावरी कुडतरकर, पल्लवी राणे, स्मिता परब, ठाकूर मॅडम, गोसावी मॅडम, आदिनाथ उस्तुरे, साक्षी बांदिवडेकर, रुत्वी सुर्वे, श्री. बडवणे यांचे सहकार्य लाभले.

स्पर्धांचा निकाल पुढीलप्रमाणे- लहान गट -मुलगे- ५० मीटर धावणे- १) भूमीश गुरुनाथ गोलतकर (तोंडवळी वरची), २)कौस्तुभ देवानंद पाटील (तोंडवळी वरची), ५० मीटर धावणे मुली- १)आराध्या देवानंद पाटील( तोंडव ळीवरची), २) दिया विजय खवणेकर (तोंडवळी खालची) १०० मीटर धावणे मुलगे- १) भूमीश गुरुनाथ गोलतकर (तोंडवळी वरची), २) सुधीर सुहास चेंदवणकर (तोंडवळी वरची), १०० मीटर धावणे मुली- १) कार्तिकी सदानंद सुर्वे (हडी नं २), २) तनिष्का जनार्दन पाटील (तोंडवळी वरची), ५०×४ रिले मुलगे- तोंडवळी वरची -विजेता, ५०×४ रिले मुली- तोंडवळी वरची – विजेता, उंच उडी मुलगे- १) कौस्तुभ देवानंद पाटील (तोंडवळी वरची), २) वेदांत गुरुनाथ धुरी (तोंडवळी खालची), उंच उडी मुली- १) श्रेया लाडोबा आडकर (तोंडवळी खालची), २) तन्वी विनोद मांजरेकर (हडी नं १), लांब उडी मुलगे- १)सहबाज ओ. अ. अन्सारी (हडी उर्दू), २) अर्णव अमित पाटील (तोंडवळी वरची), लांब उडी मुली- १) आराध्या आनंद कोचरेकर (तोंडवळी खालची), २) तन्वी विनोद मांजरेकर (हडी नं १), कबड्डी – मुलगे- विजेता – तोंडवळी वरची, खो खो मुलगे – विजेता -हडी नं १, ज्ञानी मी होणार- विजेता- तोंडवळी वरची, समूहगान- तोंडवळी वरची, समूहनृत्य- तोंडवळी खालची.

मोठागट – १०० मीटर धावणे मुलगे- १) रिषभ संजय कदम (हडी नं १), २) वृषभ गुरुनाथ गोलतकर (तोंडवळी वरची), १०० मीटर धावणे मुली- १) नियती निशांत गोलतकर (तोंडवळी वरची), २) शानननुरी अख्तर अन्सारी (हडी नं १), २०० मीटर धावणे- मुलगे- १) संग्राम बाबाजी हडकर (हडी नं १), २) वेदांत संतोष पाटील (तोंडवळी वरची), २०० मीटर धावणे मुली- १) नियती निशांत गोलतकर (तोंडवळी वरची), २) सोनिया मंगेश तोंडवळकर (तोंडवळी वरची), १००×४ रिले मुलगे- विजेता – तोंडवळी वरची, १००×४ रिले मुली- प्रथम – तोंडवळी वरची, लांब उडी मुलगे- १) ओम गुणवंत तिरवडेकर (तोंडवळी वरची), २)प्रणव दशरथ गावकर (हडी नं १), लांब उडी मुली- १) नम्रता विनोद साळकर (हडी नं. १), २)सानिया मंगेश तोंडवळकर (तोंडवळी वरची), उंचउडी मुलगे- १) रिषभ संजय कदम (हडी नं १), २)वृषभ गुरुनाथ गोलतकर (तोंडवळी वरची), उंच उडी मुली- १) आरोही मंगेश तोंडवळकर (तोंडवळी वरची), २)सारा जमाल शेख (हडी नं १), गोळा फेक मुलगे- १) समर्थ संदीप रावले ( हडी नं १), २) वेदांत संतोष पाटील( तोंडवळी वरची), गोळा फेक मुली- १)सारा जमाल शेख (हडी नं १), २)श्रेया सुरेंद्र धुरत (तोंडवळी वरची), कबड्डी मुलगे- तोंडवळी वरची, कबड्डी मुली- तोंडवळी वरची, खो खो मुलगे – तोंडवळी वरची, ज्ञानी मी होणार- तोंडवळी वरची, समूहगान- तोंडवळी वरची, समूहनृत्य- हडी नं १ शाळा.

या स्पर्धेत विद्यार्थी व शिक्षक यांनी घेतलेल्या परिश्रमाचे मालवण गटशिक्षणाधिकारी संजय माने यांनी कौतुक व अभिनंदन केले. तसेच जिल्हास्तरापर्यंत पोहचण्यासाठी विद्यार्थांना शुभेच्छा दिल्या. विजेत्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेच्या बक्षिस वितरण समारंभास हडीचे सरपंच प्रकाश तोंडवळकर, हर्षद पाटील, दीक्षा गावकर, साक्षी कदम आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभुदास आजगांवकर यांनी केले. यावेळी हडी केंद्रातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते.

You cannot copy content of this page