ठाकरे शिवसेना आचरा जि. प. मतदार संघाची उद्या बैठक…

⚡मालवण ता.१०-: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची आचरा जिल्हा परिषद मतदार संघाची बैठक माजी आमदार वैभव नाईक व मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवार दि. ११ डिसेंबर रोजी सायंकाळी ठीक ४ वाजता आचरा येथे मंगेश टेमकर यांच्या लौकिक हॉल येथे आयोजित करण्यात आली आहे.

या बैठकीस सर्व शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते, महिला पदाधिकारी कार्यकर्ते, युवासेना पदाधिकारी कार्यकर्ते यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आचरा विभागप्रमुख समीर लब्दे यांनी केले आहे.

You cannot copy content of this page