परूळेकर दत्तमंदिरात विविध कार्यक्रम…!

⚡वेंगुर्ला ता.१०-: वेंगुर्ला येथील परूळेकर दत्त मंदिरात दि. १४ व १५ डिसेंबर या कालावधीत ११७ वा दत्तजयंती उत्सव विविध कार्यक्रमांनी संपन्न होणार आहे.

  परूळेकर दत्त मंदिर वाड्यात अनेक वर्षे सिधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची मोफत राहण्याची सोय होत असे. अनेक विद्यार्थी-विद्यार्थीनींनी या वाड्यात राहून शाळा व महाविद्यालय शिक्षण घेतले आहे. या सर्वांचा आणि परूळेकर कुटुंबियांचा स्नेहमेळावा श्री दत्त जयंतीचे औचित्य साधून १४ डिसेंबर रोजी सकाळी ९ पासून आयोजित केला आहे. सायं. ५ वा. ह.भ.प. अरूण सावंत बुवा यांचे दत्तजन्माचे किर्तन, ७ वा. दत्तजन्म, ८ वा.पालखी प्रदक्षिणा होणार आहे.

  दि. १५ डिसेंबर रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत साने गुरूजी शिक्षक साहित्य संमेलन होणार आहे. सायं.६.३० वा. पार्सेकर मंडळाचे ‘मायाजाल‘ हे नाटक होणार आहे. तरी सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा तसेच स्नेहमेळाव्याला संबंधितांनी उपस्थित रहावे असे आवाहन अॅड.देवदत्त परूळेकर यांनी केले आहे.
You cannot copy content of this page