विनायक राऊत यांच विधान: अर्चना घारें बाबत राजन तेलींनी केलेला आरोप हा अभ्यासपूर्ण असेल..
⚡सावंतवाडी ता.१०-: रविंद्र चव्हाण यांनीच विशाल परब यांना निवडणूकीत उभे केल्याची चर्चा आहे असे विधान माजी खासदार विनायक राऊत यांनी केले.
.
ते म्हणाले, अर्चना घारे यांना निवडणूकीत उभे करण्यात राणे, केसरकरांचा हात असेल असं विधान राजन तेली यांनी केलं असेल तर तशी शक्यता आहे मला त्याबाबत कल्पना नाही. राजन तेली यांनी आरोप केला असेल तर तो अभ्यासपूर्ण असेल. असेही विनायक राऊत यांनी स्पष्ट केले.
रविंद्र चव्हाण यांनीच विशाल परब यांना उभे केल्याची चर्चा आहे असे विधान देवेंद्र फडणवीस व विशाल परब यांच्या व्हायरल फोन कॉलवर भाष्य करताना माजी खासदार विनायक राऊत यांनी केलं.
यावेळी विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले आदी उपस्थित होते.
