गुरांना होणाऱ्या रोगांबाबत चर्चा
*💫सावंतवाडी दि.२७-:* सरपंच संघटनेच्यावतीने आज सावंतवाडी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांची सरपंच सेवा, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष श्री प्रेमानंद देसाई यांनी भेट घेतली. यावेळी गुरांना होणाऱ्या आजाराबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी रोणापाल गावचे सरपंच सुरेश गावडे, निगुडे उपसरपंच गुरुदास गवंडे आदी उपस्थित होते. जिल्ह्यातील अनेक गुरांना त्यांच्या अंगावर जखमा होऊन त्यांना आजार होत आहेत. या आजारावर योग्य ते उपचार होत नाहीत, असे तहसीलदारांना सांगण्यात आले. तहसीलदारांनी तातडीने पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना गावागावात फिरून गुरांची माहिती घेण्यास सांगितले. या आजारावर योग्य ते उपचार करा तसेच ज्या ठिकाणी पशुवैद्यकिय अधिकारी हजर नसतील त्या ठिकाणी तातडीने अन्य तालुक्यातील अधिकाऱ्यांना पाचारण करा या संदर्भात चर्चा करण्यात आली. तसेच भातशेतीचे नुकसानीचे पंचनामे झालेले आहेत तरी अजून शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले नाहीत या संदर्भात.सुद्धा लवकरात लवकर कार्यवाही करा असेही तहसीलदार यांना सांगितले.