⚡वेंगुर्ला ता.३०-: वेंगुर्ला येथील सद्गुरु नारायण महाराज श्री गोंदेकर आश्रमातून दरवर्षीप्रमाणे पंढरपूर येथे निघणा-या पायी वारीचे प्रस्थान २ नोव्हेंबर रोजी होणार आहे. पायी वारीचे यंदाचे हे ४९ वे वर्ष आहे.
दि. २ रोजी सकाळी श्री गोंदेकर आश्रमातून वारीचे प्रस्थान होऊन वेंगुर्ला बाजारपेठेतून दुपारी भटवाडी येथील बिपिन वरसकर यांच्या तर रात्रौ मठ येथील सुरेश नाईक यांच्या निवासस्थानी मुक्कामास राहणार आहे. दि. ३ रोजी सकाळी कै.चंदूशेठ बाग, दुपारी कामळेवीर, रात्रौ बबन नाईक (कोलगांव), दि. ४ रोजी दुपारी साटम महाराज मठ, रात्रौ आंबोली, दि. ५ रोजी दुपारी आजरा, रात्रौ निपाणी, दि.६ रोजी दुपारी नरसिहवाडी, रात्रौ मिरज, दि.७ रोजी दुपारी नागज, रात्रौ पंढरपूर येथे पोहचणार आहे. दि. ८ ते १३ नोव्हेंबर या कालावधीत पंढरपूर येथे मुक्काम होऊन १४ रोजी वारकरी आपापल्या घरी पोहोचणार आहेत.
