पारंपरिक मच्छिमारांच्या पाठीशी कायम उभे राहणार…

आमदार वैभव नाईक:राणेंचे पारंपरिक मच्छिमारावर असणारे प्रेम फक्त निवडणुकी पुरते..

मालवण दि प्रतिनिधी

विधानसभेची निवडून होऊ घातली आहे निवडणुकीत सत्ता महाविकास आघाडीची सत्ता निश्चित येणार आहे येणाऱ्या काळात महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर एलईडी फिशिंग वरती कठोर कारवाई केली जाणार आहे. आताचे सरकार हे एलईडी फिशिंग करणाऱ्याना पाठीशी घालण्याचे काम करत आहे. एलईडी फिशिंग करणारे या सरकारचे तसेच राणेचे कार्यकर्ते आहेत त्याना हे पाठीशी घालत आहेत निवडूका आल्यावर राणे कुटुंबाला पारंपरिक मच्छिमार आठवतो. राणेंचे पारंपरिक मच्छिमारावर असणारे प्रेम फक्त निवडणुकी पुरते असल्याची टीका कुडाळ मालवण मतदार संघांचे उठबा गटाचे उमेदवार आमदार वैभव नाईक यांनी आचरा पिरावाडी येथे बैठकी दरम्यान केली.

आमदार वैभव नाईक यांनी आपल्या प्रचारासाठी आचरा येथे दाखल झाले होते यावेळी त्यांनी आचरा येथील श्रीदेव रामेश्वराचे दर्शन घेत प्रचाराला सुरुवात केली यावेळी आचरा येथील प्रचार कार्यालयाचे उदघाटन केले व आचरा पिरावाडी येथील मच्छिमार महिला बांधव यांच्या भेटी घेत संवाद साधला यावेळी त्यांच्या समवेत शिवसेनेत नुकतेच दाखल झालेले माजी आमदार परशुराम उपरकर,माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, जिल्हा प्रवक्ते मंदार केणी, मालवण तालुका प्रमुख हरी खोबरेकर, विनायक परब, नारायण कुबल, समीर लब्दे, नितीन घाडी, अनुष्का गांवकर, पूर्वा तारी, माणिक राणे, अर्चन  पांगे, दिलीप कावले, राजू परब, राजू नार्वेकर, परेश तारी, जयदीप कुबल, मंदार खोबरेकर, उदय दुखंडे, आशु बांदिवडेकर, हर्षद पाटील, केदार परुळेकर, अनिल गांवकर,  समृद्धी आसोलकर, संजना रेडकर, सचिन रेडकर, श्रीकृष्ण वायंगणकर, तसेच शिवसैनिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

नारायण राणेंना त्यावेळी शिवसेनेत आणले ही चुकच : परशुराम नउपरकर

आचरा येथील बैठकीत बोलताना जीजी उपरकर यांनी नारायण राणे यांच्यावर टीका केली आचरा येथील राडा झाल्यावर शेकडो पारंपरिक मच्छिमारांकडे दुर्लक्ष करून पर्सनेट वाल्याना आचऱ्यात येऊन भेटणारे नेते हे नारायण राणे होते. फयान वादळं झाल्यावर आपण शासनाकडे पाठपुरावा करून मच्छिमार बांधवांसाठी निधी मिळवला होता तो परत मागे घालवण्याचे काम राणे यांनी केले. बाळासाहेब असताना नारायण राणे यांना आम्ही शिवसेनेत आणले ही आमची चुकच होती. वैभव नाईक यांच्यावर दहशतीचा आरोप करणाऱ्या राणेंनी जिल्ह्यात दहशत निर्माण केली. विकासासाठी काम करणाऱ्या वैभव नाईक यांना निवडून देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी मच्छिमार बांधवाना केले.

You cannot copy content of this page