अपप्रवृत्ती लोक गावात आल्यास जनतेने हाकलून लावावे…

मंत्री दिपक केसरकर:मला एक देवाने राजकीय विरोधक दिला आहे मी जी कामे केली त्याचा नारळ फोडण्याचे काम तो करत; राजन तेलींना टोला..

⚡सावंतवाडी ता.२७-:
माझा संघर्ष हा यापुर्वी अख्ख्या महाराष्ट्राने पाहिला आहे आता माझा संघर्ष हा शेतकऱ्यांना फसवणाऱ्यांना अशा अपप्रवृत्ती गावात आल्यास त्याला जनतेने हाकलून लावावे असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी आज येथे केले.श्री केसरकर यांनी आज आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली यावेळी ते बोलत होते.

त्यांच्यासोबत शिंदी सेनेचे जिल्हा संघटक संजू परब, महिला जिल्हा संघटक ॲड नीता कवीटकर, सावंतवाडी शहरप्रमुख बाबू कुडतरकर, आदी उपस्थित होते.

ते म्हणाले, राज्याचा शालेय शिक्षण मंत्री म्हणून आपण क्षेत्रामध्ये वेगळी क्रांती घडवून आणली आहे राज्यात एक गणवेश केला आहे शिक्षकांचे अनेक प्रश्न आपण सोडवले आहेत मंत्रीपदाची मोठी जबाबदारी आपल्यावर असल्याने मतदार संघात येता आले नाही याचे दुःख मला आहे. मध्ये मध्ये येऊन जनतेला भेटावं अशी त्यांची इच्छा असते मात्र यापुढे हे प्रेम निश्चितच त्यांना दिले जाईल माझी कायम आमदार व्हावे अशी इच्छा नाही परंतु मी जे स्वप्न जनतेला ठेवले आहे मंजूर केलेली विकास कामे अपूर्ण आहेत ती पूर्ण करण्यासाठी तसेच ज्याप्रमाणे मुंबईमध्ये अमलाग्रह बदल घडवून आणला तो बदल मला जिल्ह्यात घडवून आणायचा असल्याने आपण पुन्हा एकदा निवडणुकीला सामोरे जात आहे.

खासदार नारायण राणे माझ्यासोबत असल्याने तसेच पालक मंत्र्यांचा आशीर्वाद असल्याने मला कशाचीही भीती नाही मला निवडून आणण्यामध्ये मोठे श्रेय आहे नारायण राणे आणि पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे असणार आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही वेळ पडल्यास आपण दोन दिवस प्रचाराला असा शब्दही दिला आहे त्यामुळे मी निश्चित आहे परंतु मला एक देवाने राजकीय विरोधक दिला आहे की मी जी कामे केली त्याचा नारळ फोडण्याचे काम तो करत आहे त्यामुळे मला केलेल्या कामाचे उद्घाटन करण्याची वेळ येत नाही असा टोला हे त्यांनी राजन तेली यांचे नाव न घेता हाणला.

You cannot copy content of this page