नट वाचनालयची सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न…

बांदा/प्रतिनिधी
बांदा शहराच्या वाचन व संस्कृतीक चळवळीचा मानबिंदू असलेल्या येथील नट वाचनालयची १३१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा वाचनालयाचे अध्यक्ष एस. आर. सावंत यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. यावेळी राजेश्वरी रूपचंद बांदेकर यांनी पाच हजार रुपयांची आर्थिक देणगी दिली.
यावेळी वाचनालयच्या वतीने वर्षभरात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचे उपस्थितांनी कौतुक केले. यावेळी विविध विषयांवर चर्चा करून वाचन संस्कृती घराघरात पोहोचविण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्यात आले.
यावेळी वाचनालयाचे उपाध्यक्ष निलेश मोरजकर, कार्यवाह राकेश केसरकर, सहकार्यवाह हेमंत मोर्ये, संचालक प्रकाश पाणदरे, शंकर नार्वेकर, जगन्नाथ सातोसकर, सुधीर साटेलकर, सौ. स्वप्नीता सावंत आदी उपस्थित होते. सर्वप्रथम दिवंगत वाचक, मान्यवर यांना श्रद्धांजली अर्पण करून सभेची सुरुवात करण्यात आली. इतिवृत्त वाचन राकेश केसरकर यांनी केले.
यावेळी ज्येष्ठ सभासद अंकुश माजगावकर, गुरुनाथ नार्वेकर, अनंत भाटे, महाबळेश्वर सामंत, नागेश मोर्ये, रामकृष्ण पेळपकर, समीर पेळपकर, सौ. अर्चना सावंत, राजेश्वरी बांदेकर यांनी चर्चेत सहभाग घेतला. यावेळी राजेश्वरी बांदेकर यांनी अध्यक्ष श्री सावंत यांच्याकडे पाच हजार रुपयांचा देणगीचा धनादेश सुपूर्द केला. आभार निलेश मोरजकर यांनी मानले.

You cannot copy content of this page