मंगेश लोके:दोषींवर कारवाई करण्यासाठी ठाकरे सेनेच १० रोजी आंदोलन..
⚡वैभववाडी ता.०८-: तालुक्यात गेल्या दीड दोन वर्षात केलेल्या कामे निकृष्ट दर्जाची आहेत. दर्जाहीन कामांमुळे रस्ते घाटरस्त्यातील संरक्षण भिंत वाहून गेली आहेत. या कामाची चौकशी होऊन दोषींवर कारवाई व्हावी या मागणीसाठी सार्वजनिक बांधकाम विरोधात ठाकरे शिवसेना १० ऑक्टोंबर ला आंदोलन छेडणार आहे.
ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख मंगेश लोके यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता यांच्याशी पत्रव्यवहार केला. सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवलीचे कार्यकारी अभियंता आणि वैभवडीचे उपाभियांचा देखरेखा खाली वयबळी तालुक्यात अनेक कामे झाली आहेत. भुईवाडा घाटात दीड दोन वर्षांपूर्वी चार कोटी रुपये खर्चून काम करण्यात आले होते. यातील उर्वरित रकमेतून याच वर्षी भुईबावडा घाटात संरक्षण भिंत बांधण्यात आली होती या भिंतीचे काम निकृष्ट झाल्यामुळे ती वाहून गेली. तेथील बाजू पट्टीचे काम देखील वाहून गेले आहे. वैभववाडी उंबर्डे रस्त्याचे काम सण २०२३-२४ मध्ये चार कोटी रुपये खर्चून करण्यात आले. निकृष्ट कामामुळे या रस्त्याची दुरावस्था झाली असून वाहतुकीस अयोग्य बनला आहे. बर पावसात या रस्त्याचे हॉट मिक्सर चे काम करण्यात आले होते. खारेपाटण- गगनबावडा रस्त्याची देखील तीच अवस्था झाली आहे. गेल्या वर्षी केलेल्या रस्त्याला आता शेकडो ग खड्डे पडले आहेत. बाजूपट्टी शिल्लकच राहिलेली नाही अशी स्थिती आहे. बांधकाम विभागाने केलेल्या निकृष्ट कामामुळे आतापर्यंत अनेक अपघात या मार्गावर झालेले आहे. अधिकार आणि ठेकेदारांनी तालुक्यातील सर्व कामे निकृष्ट केले आहेत.
याबाबत वेळोवेळी कळवूनही संबंधितांवर कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे या कामाची तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी आपण केली होती. परंतु त्या संदर्भात कोणतीही कारवाई न केल्यामुळे १०ऑक्टोबरला बांधकाम विरोधात येथील तहसिल कार्यालयासमोर असंख्या कार्यकर्त्यासह उपोषणास बसणार असल्याचा इशारा ठाकरे शिवसेनेकडून देण्यात आला आहे.
