⚡बांदा ता.२१-: बांदा शहर भाजपच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शहर मर्यादित आकर्षक गणेशमूर्ती सजावट स्पर्धेत शहरातील आळवाडा येथील विठ्ठल गवळी यांनी प्रथम क्रमांक मिळविला. ही स्पर्धा भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी पुरस्कृत केली आहे.
स्पर्धेत काळसेवाडा येथील कांता हळदणकर यांनी द्वितीय तर नारायण बांदेकर (आळवाडा) यांनी तृतीय क्रमांक मिळविला. स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांक विजेत्यांना अनुक्रमे रोख ५०००, ३०००, २००० रुपयांचे पारितोषिक देण्यात आले.
गणेशमूर्तीच्या वस्त्र व अलंकार यांच्या निकषावर परीक्षण करण्यात आले. ही स्पर्धा खुली असल्याने अनेक स्पर्धकांनी स्पर्धेत सहभाग घेतला. भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी श्यामकांत काणेकर यांच्या हस्ते पारितोषिक प्रदान करण्यात आले. यावेळी शहर अध्यक्ष नरसिंह काणेकर, राकेश केसरकर, केदार कणबर्गी, शैलेश केसरकर आदिसह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.
बांदा भाजप आयोजित गणेशमूर्ती सजावट स्पर्धेत विठ्ठल गवळी प्रथम…
