विशाल परब यांचे गौरवोद्गार: आरती संग्रहाचे विशाल परब यांच्याहस्ते प्रकाशन..
⚡सावंतवाडी ता.०५-: ग्लोबल महाराष्ट्र चॅनल ने आपल्या दर्जेदार बातम्या प्रमाणे दरवर्षीचा गणेश आरती संग्रह हे पुस्तकही दर्जेदार वाचकांना आवडणारे असे प्रसिध्द केले. असे गौरवोद्गार भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी काढले. श्री परब यांच्या हस्ते आज ग्लोबल महाराष्ट्र चॅनलने प्रसिद्ध केलेल्या आरती संग्रह पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.
ग्लोबल महाराष्ट्र चॅनल दरवर्षी प्रमाणे यावर्षीही गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर आरती संग्रह पुस्तक वाचक व गणेश भक्तांसाठी प्रसिद्ध केले आहे दर्जेदार असे हे पुस्तक असून याचा गणेश भक्तांनी तसेच वाचकांनी लाभ घ्यावा असे आवाहन चॅनलच्या माध्यमातून करण्यात येत आहे.
यावेळी राजू बेग,दिलीप भालेकर आदी उपस्थित होते
