सावंतवाडीत उद्या शिवसेना महिला आघाडी कडून भव्य मेळावा…

⚡सावंतवाडी ता.२७-: सावंतवाडी मतदारसंघातील शिवसेना महिला आघाडीचा भव्य मेळावा उद्या रवींद्र मंगल कार्यालय येथे घेण्यात येणार आहे.याबाबतची माहिती शिवसेना महिला जिल्हाप्रमुख अँड. नीता सावंत कवीटकर यांनी दिली. या मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना उपनेत्या मीनाताई कांबळी यांचे मार्गदर्शन लाभणार आहे तरी जास्तीत जास्त महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हाने सौ अँड निता सावंत कविटकर यांनी केले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात शिवसेना महिला आघाडीतर्फे मेळावा घेण्यात येणार आहे या मेळाव्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत जास्तीत जास्त कर्ज भरून मदत करणाऱ्या महिला भगिनींचा सत्कार करण्यात येणार आहे.तसेच स्वयंप रोजगाराचे प्रशिक्षण देण्यात आलेल्या 22 महिलांना सर्टिफिकेट वाटप करण्यात येणार असून अशा भव्य दिव्य मेळावा उद्या सावंतवाडीत शिंदे शिवसेनेच्या माध्यमातून आयोजित करण्यात आला आहे.

You cannot copy content of this page