Headlines

अणसूर पाल हायस्कूलची प्रतिकृती प्रथम…!

⚡वेंगुर्ला ता.१३-: नुकत्याच पार पडलेल्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात अणसूर पाल हायस्कूलमधील दहावीतील साहिल गावडे याने विद्यार्थ्यांना स्वअभ्यासासाठी उपयुक्त ठरणा­­-या, अल्पखर्चिक सुक्ष्मदर्शक, प्लास्टोस्कोप या विज्ञानप्रतिकृतीचे सादरीकरण करून प्रथम क्रमांक पटकाविला.

Read More

विज्ञान प्रदर्शनमध्ये वेतोरे हायस्कूलचे घवघवीत यश…!

⚡वेंगुर्ला ता.१३-: नुकत्याच संपन्न झालेल्या वेंगुर्ला तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात वेतोरे येथील श्री देवी सातेरी हायस्कूल व कै.सौ.गुलाबताई दिनानाथ नाईक कनिष्ठ महाविद्यालयाने घवघवीत यश संपादन केले.

Read More

सुधाताई कामत शाळा नं २ येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद…

⚡सावंतवाडी ता.१३-: येथील सुधाताई कामत शाळा नं २ येथे घेण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरात इयत्ता पहिली ते पाचवीच्या मुलांची मोफत आरोग्य तपासणी करुन तपासणी केलेल्या मुलांना आवश्यक औषधे समता महिला मंडळाच्यावतीने मोफत देण्यात आली.यावेळी समता महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ गायत्री देवस्थळी, सचिव सौ मंजिरी घोपेश्वरकर, खजिनदार सौ-प्राजक्ता पंतवालावलकर आणि…

Read More

मालवण कट्टा येथे आभाळमाया ग्रुपतर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन…

⚡ओरोस ता १३-: सहकारमहर्षी कै.डी.बी.ढोलम यांच्या स्मृतिदिनानिमित्त आभाळमाया ग्रुप आणि जी.एच.फिटनेस कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार १५ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ९ ते दुपारी १.३० वाजेपर्यंत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.कोरोना काळापासून कट्टा पंचक्रोशीत सामाजिक कार्यासाठी सुरू झालेल्या आभाळमाया ग्रुप कडून २०२१ पासून सहकारमहर्षी कै.डी.बी.ढोलम साहेब यांच्या स्मृतीप्रित्यर्थ रेकॉर्डब्रेक रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात…

Read More

बांद्यात श्री बांदेश्वर भुमिका देवस्थान जत्रोत्सव रविवारी…!

⚡बांदा ता.१३-: बांदा येथिल प्रसिद्ध श्री बांदेश्वर भुमिका देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव रविवार दिनांक १५ डिसेंबर रोजी साजरा होत आहे. प्रतिवर्षाप्रमाणे या जत्रोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षीप्रमाणे जत्रोत्सवा पासुन श्री बांदेश्वराच्या दर सोमवारी होणाऱ्या पालखी प्रदक्षिणा सोहळ्याचा शुभारंभ होणार आहे.  रविवार दिनांक १५ रोजी सकाळी श्री बांदेश्वर श्री भुमिका मंदिरात पुजा अर्चा…

Read More

कणकवली खरेदी विक्री संघातर्फे भात खरेदी शुभारंभ…!

⚡कणकवली ता.१३-: कणकवली तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाच्या वतीने शासकीय भात खरेदीचा शुभारंभ उपविभागीय अधिकारी (महसुल) कणकवलीचे जगदिश कातकर यांच्या हस्ते करण्यात आला. प्रतिक्विंटल २३०० रुपयाने भात खरेदी करण्यात येत आहे. या वेळी शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष प्रकाश मुकुंद सावंत, सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक विठ्ठल दत्ताराम देसाई, शेतकरी सहकारी खरेदी…

Read More

“स्वामीकिरण दिनदर्शिके” चे प्रकाशन…

बांदा/प्रतिनिधी‘स्वामीकिरण दिनदर्शिके’च्या पाचव्या आवृत्तीचे प्रकाशन आज मान्यवरांच्या उपस्थितीत येथील श्री देव बांदेश्वर-भूमिका मंदिरात करण्यात आले. ही दिनदर्शिका शहरातील नागरिकांसाठी विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यावेळी देवस्थान समितीचे अध्यक्ष राजाराम उर्फ बाळु सावंत, दत्तप्रसाद कला क्रीडा युवक मंडळाचे सचिव शैलेश लाड, स्वामीकिरण परिवाराचे सदस्य पत्रकार निलेश मोरजकर, लाड मित्रमंडळाचे सचिव संदीप नार्वेकर, कर सल्लागार समीर…

Read More

अनधिकृत भोंगे लावणाऱ्यांवर कारवाई होणार…

कुडाळमध्ये सर्वधर्मीयांच्या बैठकीत पोलिसांच्या सक्त सूचना:आमदार निलेश राणे यांच्या मागणीची त्वरित दखल कुडाळ : शिवसेना आमदार निलेश राणे यांची अनधिकृत भोंग्या संदर्भात दिलेल्या पत्राची कुडाळचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी तात्काळ दखल घेतली.  गुरुवारी कुडाळ पोलीस ठाणे येथे सर्वधर्मीयांची बैठक आयोजित करून सर्वोच्च न्यायालयाच्या  आदेशानुसार राज्य शासनाने काढलेल्या आदेशाचे पालन झाले नाही तर अनधिकृत भोगे लावणाऱ्यांवर…

Read More

कणकवली नगरपंचायत हद्दीमध्ये एकल वापर प्लास्टिक वापर करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई…

⚡कणकवली ता.१३-: एकल वापर,प्लास्टिक बंदीच्या अनुषंगाने केंद्रीय व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून दर महिन्याला अंमलबजावणी करण्यासाठी मोहीम राबिवण्याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत. या अनुषंगाने मुख्याधिकारी गौरी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कणकवली नगरपंचायत हद्दीमध्ये एकल वापर प्लास्टिक वापर करणाऱ्या रस्त्यावरील विक्रेते, फुल विक्रेते, स्थानिक बाजारपेठ, भाजीपाला विक्रेते आणि दुकाने यांच्यावर न.प.अधिकारी व कर्मचारी यांच्या पथकाद्वारे कारवाई करण्यात…

Read More

आमदार नितेश राणे यांच्या मागणी वरून सीएसटी ते करमळी स्पेशल रेल्वेला वैभववाडी आणि सावंतवाडी मिळाला थांबा…

⚡कणकवली ता.१२-: ०११५१/०११५२ सीएसटी ते गोवा करमळी अशा धावणाऱ्या हिवाळी विशेष रेल्वे गाडीला आमदार नितेश राणे यांच्या मागणीची दखल घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी रोड आणि सावंतवाडी रोड येथे थांबे देण्यात आले आहेत. आमदार नितेश राणे यांनी रेल्वे मंत्रालय आणि रेल्वे प्रशासनाकडे याबाबतचा पत्रव्यवहार करून तातडीने हे थांबे मंजूर केले जावेत अशी विनंती केली होती आणि…

Read More
You cannot copy content of this page