31 डिसेंबरला गडकिल्ले वर जाण्यास व पार्टी करण्यास प्रतिबंध करावा

कुडाळात हिंदू जनजागृती समितीने वेधले तहसीलदार पोलिस प्रशासनाचे लक्ष *💫कुडाळ दि.२१-:* गडकोट, पर्यटनस्थळे, ऐतिहासिक अन् सार्वजनिक ठिकाणी 25 व 31 डिसेंबर रोजी मद्यपान, धूम्रपान, पार्ट्या करणे व फटाके फोडण्यास प्रतिबंध करण्याचा आदेश काढण्यात यावा पोलिसांची गस्तीपथके नेमून याचे उल्लंघन करणाऱ्यां कारवाई करावी.या रात्री राज्यातील प्रमुख पर्यटनस्थळे, गड-किल्ले, ऐतिहासिक स्थळे आदी सार्वजनिक ठिकाणांवर जाण्यास मज्जाव करण्यात…

Read More

मराठा शिक्षक संघटनतर्फे सिंधुदुर्ग किल्ल्यात स्वच्छता मोहीम

*💫मालवण दि.२१-:* मराठा शिक्षक संघटन सिंधुदुर्ग आयोजित गडकिल्ले स्वच्छता मोहिमे अंतर्गत संत गाडगेबाबा पुण्यतिथी निमित्त पहिली स्वच्छता मोहिम मालवण सिंधुदुर्ग किल्यावर राबविण्यात आली. यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४५ मराठा शिक्षक बांधव सहभागी झाले होते. दोन ग्रुपमध्ये ही स्वच्छता मोहिम राबविली. पहिल्या गटाने संपुर्ण किल्यावरील प्लॅस्टिक बाँटल, प्लँस्टिक पिशव्या सुमारे सहा पिशव्याभरुन गोळा केल्या. तर दुसऱ्या गटाने…

Read More

सावंतवाडी शहरात वन्य माकडांचा उपद्रव

युवा रक्तदाता संघटनेने वनविभागाचे वेधले लक्ष;सहाय्यक उपवनसंरक्षक आय. डी. जळगावकर यांना निवेदन *💫सावंतवाडी दि.२१-:* सावंतवाडी शहरात वन्य माकडांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. माकडांचा शहरवासीयांना होणाऱ्या त्रासाबाबत युवा रक्तदाता संघटनेने वनविभागाचे लक्ष वेधले. याबाबत सहाय्यक उपवनसंरक्षक आय. डी. जळगावकर यांना निवेदन देण्यात आले. सावंतवाडी शहरात वन्य माकडांचा उपद्रव वाढला असून मनुष्य वस्तीत प्रचंड प्रमाणात नासधूस…

Read More

जिल्ह्यात आज 9 जण कोरोना पॉझिटीव्ह

सक्रीय रुग्णांची संख्या 379;जिल्हा शल्य चिकित्सक *💫सिंधुदुर्गनगरी दि.२१-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 5 हजार 220 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 379 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 9 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

Read More

जिल्हास्तरीय निंबध स्पर्धेत नेमळे पंचक्रोशी विद्यालयाचे यश

*💫वेंगुर्ला दि.२१-:* ग्राहक पंचायत महाराष्ट्र कोकण विभाग सिंधुदुर्ग व राजापुर को. आँपरेटिव्ह बँक वैभववाडी शाखा आयोजित जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात इयत्ता अकरावी बारावी या उच्चमाध्यमिक गटात नेमळे पंचक्रोशी विद्यालयातील उच्चमाध्यमिक विभागातील आशिया सांगावकर हिने जिल्ह्यात प्रथम तर दिक्षा जाधव हिने दुसरा क्रमांक मिळविला. आणि उत्तेजनार्थ नंबर याच विद्यालयातील हर्षदा वेंगुर्लेकर हिला…

Read More

ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला धक्का

राणे समर्थक वासुदेव पावसकर यांचा शिवसेनेत प्रवेश *💫मालवण दि.२१-:* आगामी गोळवन कुमामे ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राणे समर्थक वासुदेव पावसकर यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. गोळवण ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला हा धक्का समजला जात आहे.. आगामी ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने पुन्हा एकदा ग्रामीण भागातील राणेंचे शिलेदार फोडण्यास सुरुवात केली आहे. मालवण तालुक्यातील गोळवण गावातील राणे समर्थक…

Read More

आगारातील वाहक चालकांची थर्मल तपासणी करा; जनसंपर्क अधिकाऱ्यांचे आदेश

जनसंपर्क अधिकारी अभिजित भोसले यांची सावंतवाडी आगाराला भेट… *💫सावंतवाडी दि.२१-:* सावंतवाडी आगारातून जाणाऱ्या प्रत्येक एस्टी मधील वाहक चालकाची थर्मल टेस्टिंग आणि स्टेंडवर सॅनिटायझर ची सोय करण्याचे आदेश जनसंपर्क अधिकारी अभिजित भोसले यांनी आगार प्रमुख वैभव पडोळे यांना देण्यात आले आहेत. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला होता. ते म्हणाले की, २३ मार्च पासून जुन पर्यंत लॉक…

Read More

आरोस-दांडेलीत खड्ड्यांमुळे अपघाताची शक्यता…

तात्पुरती डागडुजी न करता पूर्ण खडीकरण व डांबरीकरण करण्याची मागणी *💫बांदा दि.२१-:* बांदा-शिरोडा आणि सावंतवाडी-आरोंदा मार्गावर आरोस-दांडेली येथील अन्य ठिकाणासह विद्या विहार हायस्कूल समोर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. गाडी हाकताना वाहनचालकांना खड्यातुन ये जा करावी लागत असल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. या मार्गावरील खड्डयांची समस्या कायमस्वरूपी मार्गी लावावी अशी मागणी होत आहे. गेली…

Read More

आरोस माऊलीचा उद्या जत्रोत्सव

*💫बांदा दि.२१-:* आरोस गावातील श्री देवी माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव मंगळवार 22 डिसेंबर रोजी साजरा होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या सर्व नियमांचे पालन भाविकांनी करण्याचे आवाहन ग्रामस्थांकडून करण्यात आले आहे.यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी श्रींची पूजा त्यानंतर नवस बोलणे, नवस फेडणे तसेच ओटी भरणे आदी धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. रात्रौ सवाद्य पालखी…

Read More

आंबडोस ग्रामपंचायत सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त वर्षभर गावात साजरे होणार विविध कार्यक्रम- राधा वरवडेकर

आंबडोस ग्रामपंचायत ५० व्या वर्षात करत आहे पदार्पण *💫सिंधूदुर्गनगरी दि.२१-:* ग्राम स्वच्छ्ता अभियानसह विविध अभियानात राज्यस्तरावर यश मिळविलेल्या मालवण तालुक्यातील आंबडोस ग्राम पंचायतीच्या स्थापनेला २० डिसेबर रोजी ४९ वर्षे पूर्ण झाली असून ५० व्या वर्षात पदार्पण केले आहे. या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त वर्षभर कार्यक्रम साजरे करण्यात येणार असल्याचे सरपंच राधा वरवडेकर यानी जाहिर केले. याचे…

Read More
You cannot copy content of this page