*खासदार विनायक राऊत उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

सिंधुदुर्ग रत्नागिरीचे खासदार तथा लोकसभा शिवसेना गटनेते विनायक राऊत उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येणार असून, उद्या सकाळी ११ वाजता सावंतवाडी विधानसभा मतदार संघाची बैठक मळगाव येथील शालू हॉटेल येथे आयोजित करण्यात आली आहे. तर त्या नंतर सायंकाळी ४:०० वाजता सिंधुदुर्ग चिपी विमानतळाला ते भेट देणार आहेत.

Read More

बांधकामचे अधिकारी मासिक सभेला दांडी मारत असल्याने अरविंद रावराणे आक्रमक

उत्तरे देता येत नसल्यास कनिष्ठ अभियंतानी सभेला येवू नये;मासिक सभेत दिली तंबी *💫वैभववाडी दि.०८-:* सार्वजनिक बांधकामचे अधिकारी मासिक सभेत वारंवार दांडी मारत आहेत. त्यांची ही कार्यपद्धत अशोभनीय आहे. तालुक्यातील रस्त्यांची अक्षरशा चाळण झाली आहे. या परिस्थितीला अधिकारी जबाबदार आहेत. कनिष्ठ अभियंत्यांना पुढे करून ते मासिक सभा टाळत आहेत. प्रश्नांची उत्तरे देता येत नसतील तर पुढील…

Read More

सेवानिवृत्त ग्राम पंचायत अधिकारी-कर्मचाऱ्यांना वसुलीच्या नोटीसा

संघटनेचा आंदोलन उभारण्याचा इशारा;जिल्हाध्यक्ष प्रकाश राणेंनी दिले सहाय्यक गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन मालवण (प्रतिनिधी) सेवानिवृत्त ग्रामसेवक, ग्रा.वि. अधिकारी, विस्तार अधिकारी यांना सेवानिवृत्ती नंतर ग्रामपंचायतीच्या थकीत रक्कम वसुलीच्या नोटिशी बजाऊन सदर रक्कमांची वसुली पेन्शन मधुन करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून होत असून हा सर्व प्रकार वेळीच थांबवावा अन्यथा तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा सेवानिवृत्त ग्रामसेवक, ग्रा. वि. अधिकारी, विस्तार अधिकारी…

Read More

सावंतवाडी तालुक्यात आज कोरोनाचे ४४ रूग्ण सापडले

*💫सावंतवाडी दि.०८ -:* सावंतवाडी तालुक्यात आज ४४ कोरोनाचे नवीन रुग्ण सापडले असून, शहरात २ तर ग्रामीण भागात ४२ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे. यामध्ये शहरात माठेवाडा १, वैश्यवाडा १ तर ग्रामीण भागात बांदा २, इन्सुली १, पाडलोस १२, शेरले १, कोंडूरा १, सावरवाड २, कोलगाव १,…

Read More

कणकवली तालुका आत्मा समिती अध्यक्षपदी वसंत तेंडुलकर

शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करा ;मनोज रावराणे यांचे आवाहन *💫कणकवली दि.०८-:* शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी शासनाने आत्मा अंतर्गत शेतकरी सल्ला समिति निर्माण केली. या समितीच्या माध्यमातून तालुक्यातील शेतकऱ्यांना वैयक्तिक लाभ व विविध योजना प्रशिक्षण अभ्यास दौरे केले जातात. नव्याने गठीत झालेल्या समितीतील सर्व सदस्यांनी संघटित काम करून शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती करावी.आत्मा शेतकरी सल्ला समितीच्या माध्यमातून…

Read More

हिवताप, डेंग्यू, हत्तीरोग विषयी जनजागृती

आरोग्य विभागाचा उपक्रम *💫मालवण दि.०८-:* आरोग्य विभागाच्या वतीने हिवताप व डेंग्यू प्रतिरोध जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येत असून या अंतर्गत आज मालवण शहरात आरोग्य कर्मचाऱ्यांकडून हिवताप, डेंग्यू, हत्तीरोग याविषयी नागरिकांमध्ये माहिती देऊन जनजागृती करण्यात आली तसेच विविध ठिकाणी साचलेल्या पाण्यात ऍबेटिंग (अळी नाशक औषध फवारणी) करण्यात आली. पावसाळ्यात अनेक ठिकाणी पाणी साचून त्यात अळ्या निर्माण होऊन…

Read More

जिल्ह्यात 22 जुलै पर्यंत मनाई आदेश

*💫सिंधुदुर्गनगरी दि.०८-:* जिल्ह्यात दि. 22 जुलै 2021 रोजी पर्यंत जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी मनाई आदेश जारी केले आहेत. जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांना प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून त्यांनी महाराष्ट्र  पोलीस अधिनियमचे कलम 37(1) (3) नुसार जिल्ह्याच्या संपूर्ण भूभागात मनाई आदेश लागू केले आहेत.             जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे. कलम 37 (1) नुसार शस्त्रे, सोटे, तलवारी,…

Read More

जिल्ह्यात आज आणखी २६६ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह

*💫सिंधुदुर्गनगरी दि.०८-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण ३८ हजार ९६३ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ३,हजार ९३५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी २६६ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

Read More

हा तर व्यापाऱ्यांसाठी दुग्धशर्करा योग

व्यापारी संघाचे अध्यक्ष प्रसाद पारकर यांचे उदगार;केंद्रीय मंत्री नामदार नारायण राणे यांचेही केले अभिनंदन मालवण (प्रतिनिधी) केंद्र सरकारने किरकोळ व्यापार क्षेत्राला उद्योगाचा दर्जा देण्याचा महत्वपुर्ण निर्णय घेऊन व्यापाऱ्यांची मागील कित्येक दशकांची मागणी पुर्ण करून देशभरातील कोट्यावधी छोट्या व्यापाऱ्यांना दिलासा देणारा निर्णय नुकताच जाहीर केला आहे. छोट्या व्यापाऱ्यांच्या दृष्टीने हा महत्वपुर्ण निर्णय होत असतानाच त्याच्या अंमलबजावणीची…

Read More

गणपती स्पेशल गाड्या मडुरा स्थानकापर्यंत सोडा

पिंट्या परब यांची मागणी *💫बांदा दि.०८-:* गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेतर्फे सीएसएमटी, पनवेल ते सावंतवाडी, रत्नागिरी दरम्यान 72 स्पेशल गाड्या चालविण्यात येणार आहेत. परंतु गोव्याच्या दिशेने महाराष्ट्राचे शेवटचे स्थानक असलेल्या मडुरा स्थानकाचा प्रशासनास विसर पडला आहे. अद्याप एकही गणपती स्पेशल गाडी मडुरा स्थानकापर्यंत सोडण्यात न आल्याने मडुरा दशक्रोशीसह हजारो प्रवाशांना त्रासाला सामोरे जावे…

Read More
You cannot copy content of this page