बांदा येथे कृषी विभागाने केली श्री पद्धतीने लागवड
सिंधूरत्न समृध्दी योजने अंतर्गत राबविला उपक्रम बांदा/प्रतिनिधीखरीपाच्या हंगामास जोरदार सुरूवात झाली असून शेतक-यांबरोबरच शेतक-यांना मार्गदर्शन करणारा व विद्यापीठाचे तंत्रज्ञान शेतक-यांपर्यंत पोहोचविणारा कृषि विभागही जोरदार कामाला लागला आहे. कृषि विभागाने २५ मे पासूनच कामाला सुरूवात केली असून सुरूवातीपासून खरीप विशेष मोहिमेतंर्गत बियाणे बिजप्रक्रिया, नंतर सिंधुरत्न समृद्धी योजनेतंर्गत भात बियाणे व नागली बियाणे वाटप, शेतकरी निवड ,पी.एम.किसान…
