विलवडे माऊली मंदिरातील फंडपेटी अज्ञाताने फोडली
बांदा /प्रतिनिधीविलवडे गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरातील फंडपेटी अज्ञात चोरट्याने फोडून आतील रक्कम घेऊन फंड पेटी नजिकच्या रस्त्यावर टाकून पसार झाल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे विलवडे परिसरात खळबळ उडाली आहे. बुधवारी सकाळी सुभाष दळवी आपल्या शेताकडे जात असतानाच त्यांना रस्त्यालगत ही फंडपेटी दिसली. ही फंडपेटी माऊली मंदिरातील असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर देवस्थान…
