सरगवे पुनर्वसन येथील बाबाजी गावकर यांचे अल्पशा आजाराने निधन…

⚡दोडामर्ग ता.१९-: सरगवे पुनर्वसन येथील बाबाजी बाळाजी गावकर (वय -६२) यांचे अल्पशा आजाराने राहत्या घरी निधन झाले. ते भारतीय दूरसंचार विभगाच्या मुंबईत एम टी एन येल कंपनीतून सेवानिवृत्त झाले होते.सद्या ते सरगवे येथे मूळगावी वास्तव्यास होते. अज सकाळीं त्यांचे निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली, जावई, चुलत भाऊ, मेहुणे असा मोठा परिवार आहे.दरम्यान त्यांच्या…

Read More

आमदार नितेश राणे यांची भाजपच्या प्रवक्ते पदी पुन्हा नियुक्ती…

कणकवली : भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून महाराष्ट्र भाजपाची भूमिका मांडण्याकरिता व प्रसारमाध्यमांकडे प्रतिक्रिया देण्याकरता पत्रकार परिषद घेणे व मीडिया बाइट देण्याकरता अधिकृत प्रवक्त्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये विभागणी करण्यात आली असून सकाळी ९ वाजता पक्षाची भूमिका मांडण्याकरता जाहीर करण्यात आलेल्या प्रमुख नेत्यांच्या यादीमध्ये कणकवली मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांना स्थान देण्यात आले…

Read More

त्या शासन आदेशाची होळी करण्यात येईल…

सतीश सावंत:शासन आदेश काढला असताना जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती काजू खरेदी करत नाही… ⚡कणकवली ता.१९-: काजूला हमीभाव न देता शेतकरी तसेच उत्पादकांना प्रति किलो दहा रुपये अनुदान देण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे.तसा शासन आदेश(जीआर) काढण्यात आला आहे.मात्र,काजू उत्पादकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा हा प्रयत्न आहे.या अनुदानासाठी जाचक अटी घालण्यात आल्या असून शासनाकडून उत्पादकांची थट्टा केली…

Read More

सिंधुदुर्ग जिल्ह्यात शासकीय मेडिकल कॉलेज सुरू करण्याचा घाट सत्ताधाऱ्यांनी घातला…

परशुराम उपरकर:दंड सत्ताधाऱ्यांनी मेडिकल कॉलेज कडे केलेल्या दुर्लक्षामुळे लागला.. कणकवली – सिंधुदुर्ग जिल्ह्यात शासकीय मेडिकल कॉलेज सुरू करण्याचा घाट सत्ताधाऱ्यांनी घातला. त्यावेळी मेडिकल कॉलेजला आवश्यक असणारी जागा, मशिनरी इत्यादी बाबींची पूर्तता केल्यानंतरच कॉलेज चालू करा अशी मागणी आम्ही केली होती. परंतु त्यावेळी कॉलेजचे डीन श्री. मोरे यांनी सत्ताधाऱ्यांच्या नादाला लागून एफीडेव्हीट करून आम्ही सर्व निकष…

Read More

अतिवृष्टीमुळे घराची संरक्षक भिंत कोसळून अनिल बिरमोळे यांच दोन लाखांचे नुकसान…

⚡मालवण ता.१९-: अतिवृष्टीमुळे मालवण तालुक्यातील घुमडे खालचीवाडी येथील अनिल हरिश्चंद्र बिरमोळे यांच्या घराच्या मागील संरक्षक भिंत कोसळून घराचा मागील भाग पूर्णतः जमीनदोस्त झाला आहे. या दुर्घटनेत सुमारे दोन लाखांचे नुकसान झाले आहे. घुमडे खालचीवाडी येथे एकत्रित पणे पाच कुटुंबांची घरे आहेत. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास आलेल्या मुसळाधार पावसात यातील अनिल बिरमोळे यांच्या मालकीच्या घराच्या मागील…

Read More

कणकवली बसस्थानकावर आढळला मृतदेह…

कणकवली : कुडाळ तालुक्यातील बिबवणे-मांगलेवाडी येथील अरविंद श्रीपतराव अडसुळे(६५) यांचा मृतदेह कणकवली एस.टी.बस स्थानकावर आढळून आला. याबाबतची माहिती श्रीपतराव अडसुळे यांनी पोलिसात दिली आहे. मयत अरविंद श्रीतपराव अडसुळे हे रोड-रोलरवर चालक म्हणून काम करतात. दहा-बारा दिवसापूर्वी ते राधानगरी येथील मुळ गावी गेले होते. आज सकाळी ११.३० वा.च्या सुमारास येथील बसस्थानकावर त्यांचा मृतदेह आढळून आला.

Read More

देशामध्ये प्रथम क्रमांकाची जिल्हा बँक बनविण्यासाठी आम्ही कटीबद्ध ;मनिष दळवी…

⚡ओरोस ता.१९-: जिल्हा बँकेने गेल्या चार दशकात आपली यशस्वी वाटचाल पूर्ण करत असतांना आज अखेर बँकेने रु. ५७६७ कोटी व्यवसायाचा टप्पा गाठलेला आहे. चालू आर्थिक वर्षात रु. ५५२.८० कोटी एवढी व्यवसायात वाढ झालेली असून बँकेचा रु. ६००० कोटींचा व्यवसायाचा टप्पा गाठण्याकडे वाटचाल सुरू आहे. बँकेने ‘आपली शेतकऱ्यांची बँक’ या ओळखीबरोबरच आता ‘डिजिटल जिल्हा बँक’ अशी…

Read More

नावळे गावात गवा रेड्यांचा धुमाकूळ,भात शेतीचे मोठे नुकसान…

⚡वैभववाडी ता.१९-: नावळे गावात गवा रेड्यांचा धुमाकूळ एक एकर भात शेतीचे मोठे नुकसान वन विभागाकडे तक्रार करूनही वनरक्षक नुकसान केलेल्या शेतीची पाहणी करण्यासाठी पोचले नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी. गवा रेड्यांचा बंदोबस्त करा नावळे गावातील शेतकऱ्यांची मागणी.सततच्या पडणाऱ्या पावसाचा फायदा घेत शेतकरी अनंत गुणाजी गुरव यांच्या एक एकर भात शेतीचे गवा रेड्यांच्या कळपाने मोठे नुकसान केले 8…

Read More

बौध्दवाडी येथील सखाराम कांबळे यांचे अल्पशा आजाराने निधन…

⚡वैभववाडी ता.१९-: वेंगसर बौध्दवाडी येथील सखाराम सोनू कांबळे वय 80 यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.वैभववाडी तालुका बौध्द सेवा संघांचे कार्याध्यक्ष, माजी सरपंच सुभाष कांबळे व पोलीस पाटील सुनील कांबळे यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चात पत्नी, तिन मुलगे, भाऊ, बहीण, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

Read More

भाजपा मालवण शहर अध्यक्षपदी बाबा मोंडकर यांची नियुक्ती…

⚡मालवण ता.१९-: भाजपा मालवण शहर अध्यक्षपदी विष्णु उर्फ बाबा मोंडकर यांची नियुक्ती करण्यात आल्याचे आज भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी मालवण येथे भाजपच्या बैठकीत जाहीर केले. यापूर्वी मालवण शहर प्रभारी म्हणून विजय केनवडेकर हे कार्यरत होते. मात्र, यामध्ये बदल करीत मालवण शहरअध्यक्ष पदी बाबा मोंडकर यांची निवड करण्यात आली आहे. मालवण भाजपची बैठक आज मालवण…

Read More
You cannot copy content of this page