Headlines

Global Maharashtra Breaking News

जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत मिलाग्रीस हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनीच घवघवीत यश…

⚡सावंतवाडी ता.१७-: क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य तर्फे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांच्यावतीने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेचे आयोजन आंबोली येथे करण्यात आले होते.या स्पर्धेत मिलाग्रीस हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. 14 वर्षाखालील वयोगटांमध्ये कु.निहारिका अमित मेस्त्री हिने 42 ते 48 किलो वजनी गटामध्ये प्रथम स्थान,कु. साची शिवनाथ टोपले हिने…

Read Full News

जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत लक्ष्मी नारायण वालावल संघाने विजेतेपद…!

⚡सावंतवाडी ता.१७-: सावंतवाडी बाजारपेठ नवरात्र उत्सव मंडळातर्फे आयोजित केलेल्या ‘श्री. दीपकभाई केसरकर पुरस्कृत कै. राजन म्हापसेकर स्मृती चषक २०२५’ या भव्य जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत लक्ष्मी नारायण वालावल संघाने विजेतेपद पटकावले. स्पर्धेचे हे ३१वे वर्ष होते. वालावल संघाने अंतिम सामन्यात दमदार कामगिरी करत प्रथम क्रमांक मिळवला आणि १०,००० रोख आणि कै. राजन म्हापसेकर स्मृती चषक जिंकला….

Read Full News

”मराठीत सांगलेला कळत नाय, मालवणीत सांगू ?”

आर्चीनं डायलॉग मारत सावंतवाडीकरांची मने जिंकली.. सावंतवाडी : युवा नेते संदीप गावडे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सावंतवाडीत होत असलेली ही भव्य दिव्य दहीहंडी पाहण्याचा योग आला. त्यांच्यामुळे आज सावंतवाडीत येता आलं. आपल्या माणसांसोबत असल्याचा अनुभव तुमच्यासोबत आला असं मत व्यक्त करत ”मराठीत सांगलेला कळत नाय, मालवणीत सांगू ?” असा डायलॉग मारत उपस्थितांची मने…

Read Full News

मळगाव दहीहंडी २०२५ ; वाफोलीचे माऊली गोविंदा पथक अव्वल..!

⚡सावंतवाडी ता.१७-: मळगाव छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे ग्रामस्थांच्या सहभागातून आणि भिल्लवाडी गृपच्या संयुक्त उपक्रमातून दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रम पाहण्यासाठी मळगाव पंचक्रोशीतील नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. पावसाळी वातावरण आणि जोरदार पाऊस असूनही गोविंदांचा उत्साह कमी झाला नाही. भरपावसातही प्रेक्षकांनी उत्सवाचा मनमुराद आनंद लुटला. स्पर्धेत माऊली गोविंदा पथक, वाफोली यांनी कमी वेळेत…

Read Full News

दहीहंडीसारख्या उत्सवातून हिंदूंच्या एकतेची ताकद दाखवून द्या…

नितेश राणे:पाच थरांची सलामी देणाऱ्या अमेय तेंडोलकर मित्रमंडळ गोविंदा पथकाला सन्मानचिन्ह व रोख पारितोषिक देऊन सन्मान… सावंतवाडी : संदीप गावडे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सावंतवाडीत होत असलेली ही भव्य दिव्य दहीहंडी पाहण्याचा आज प्रथमच योग आला. दहीहंडी सारखा उत्सव हा हिंदू धर्माच्या दृष्टिकोनातून फारच महत्त्वाचा सण आहे. या दहीहंडीच्या निमित्ताने सर्व हिंदू बांधव…

Read Full News

संदीप गावडे यांच्यावर सोपवलेली जबाबदारी ते यशस्वीरित्या पार पडतात…

अतुल काळसेकर:विविध स्तरावर काम करणाऱ्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचा संदीप गावडे यांच्या माध्यमातून सत्कार.. ⚡सावंतवाडी ता.१७-: संदीप गावडे यांच्यावर सोपवलेली जबाबदारी ते यशस्वीरित्या पार पडतात हे हरघर तिरंगा अभियानाच्या माध्यमातून समोर आले. त्यांनी केलेल्या यशस्वी नियोजनामुळेच या अभियानामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचा नंबर राज्यात प्रथम आला. त्यांचे काम आणि कार्य पाहता भविष्यात ते निश्चितच वेगळी उंची गाठतील अशा शब्दात…

Read Full News

पर्यटन वाढीसाठी सावडाव धबधब्याचा फायदा होणार…

खा. नारायण राणे :सावडाव धबधब्याच्या नूतनीकरणाच्या कामाचे खा. नारायण राणे यांच्याहस्ते उद्घाटन,पालकमंत्री ना.नितेश राणे जिल्हाधिकारी अनिल पाटील यांची प्रमुख उपस्थिती. ⚡कणकवली ता.१७-: सिंधुदुर्ग जिल्ह्यात वर्षा पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेला कणकवली तालुक्यातील सावडाव धबधबा! या धबधब्याच सिंधुरत्न योजनेच्या माध्यमातून नूतनीकरण करण्यासाठी ६५ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर येथील कामही पूर्ण करण्यात आले. या नूतनीकरणाच्या कामाचे…

Read Full News

देवगड समुद्रकिनाऱ्यावर आढळला शिर नसलेला मृतदेह…

⚡देवगड ता.१६-: येथील फणसे समुद्रकिनाऱ्यावर शिर नसलेला मृतदेह आढळून आला आहे. ही घटना आज सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. त्यामुळे परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. नेमका हा मृतदेह कोणाचा? त्याचे शीर कसे काय गायब झाले? यावरून उलट-सुलट चर्चेला उधाण आले असून अपघात की घातपात? याबाबत प्रश्नचिन्ह व्यक्त होत आहे. या प्रकरणी देवगड पोलीस ठाण्यात…

Read Full News

बॉम्बे नर्सिंग होम रजिस्ट्रेशन प्रश्नावर सकारात्मक तोडगा…

मंत्री नितेश राणे यांचा पुढाकार:लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत संयुक्त बैठक.. सिंधुदुर्ग दि.१६-: बरेच दिवस प्रलंबित असलेल्या बॉम्बे नर्सिंग होम रजिस्ट्रेशन विषयावर अखेर मार्ग काढण्यात आला आहे. आरोग्यमंत्री, आरोग्य सचिव, संबंधित संचालक, तसेच इतर वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी स्वतः पुढाकार घेतला. यानिमित्त संस्थेच्या वतीने त्यांचे आभार…

Read Full News

शिवसेना कुडाळ शहर प्रमुख पदी अभिषेक गावडे…

कुडाळ : आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत शहरप्रमुख पदी नगरसेवक अभिषेक गावडे यांची जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी निवड जाहीर केली. तर उपजिल्हाप्रमुखपदी माजी नगराध्यक्ष ओंकार तेली यांची निवड करण्यात आली.कुडाळ येथे नुकतीच शिवसेनेची बैठक जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या अध्यक्षतेखाली व आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीमध्ये झाली. या बैठकीमध्ये नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. यामध्ये उपजिल्हाप्रमुखपदी…

Read Full News

You cannot copy content of this page